ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 625 व्यक्ती कोरोना बाधित तर तिघांचा मृत्यू - corona case in nanded

नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 625 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

In Nanded district, 625 people were infected with corona and three died
नांदेड जिल्ह्यात 625 व्यक्ती कोरोना बाधित तर तिघांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 18, 2021, 10:06 PM IST

नांदेड - कोरोनाशी दोन हात करताना नांदेड जिल्ह्याने एका विशिष्ट कालावधीत देशात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रूग्णसंख्येचा आकडा दिला आहे. हा आकडा कोणत्याही खासगी संस्थेने जाहीर केलेला नसून सरकारच्याच संस्थेने जारी केला आहे. देशातील ७० जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांमध्ये सर्वाधिक वेगाने संसर्ग पसरल्याचे या अहवालात म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यात 385 टक्क्यांनी वाढला कोरोना-

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने १ ते १५ मार्च दरम्यान देशातील ७० निवडक जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णसंख्येच्या बदलेल्या स्थितीचा आढावा घेतला. देशातील ७० जिल्हे पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगाने कोरोना संख्या वाढलेले क्षेत्र होते. महाराष्ट्रातील नांदेड, नंदुरबार, बीड, पुणे, नाशिक, जळगाव, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद व अकोला या १३ जिल्ह्यांचा यात समावेश होता. सरकारी संस्थेने केलेल्या पाहणीत नांदेड जिल्ह्यात आधीच्या १५ दिवसाच्या तुलनेत नंतरच्या पंधरा दिवसात तब्बल ३८५ टक्क्यांनी रुग्ण संख्या वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.

गुरुवारी 625 कोरोना बाधित-

नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 625 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 361 तर अँटिजेन तपासणीद्वारे 264 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 29 हजार 145 एवढी झाली आहे.

तीन जणांचा मृत्यू-

बुधवार 17 मार्च 2021 रोजी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 627 एवढी झाली आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-

एकूण घेतलेले स्वॅब- 2 लाख 59 हजार 04
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 25 हजार 20
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 29 हजार 145
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 565

एकूण मृत्यू संख्या-627

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 84.28 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-325
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 728
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-51.

हेही वाचा- सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.