ETV Bharat / state

नांदेड : पहिल्याच पावसात ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय - nanded news

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते पहिल्याच पावसात चिखलमय झाले आहेत. रस्त्यात मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

muddy roads
चिखलमय रस्ते
author img

By

Published : Jun 21, 2020, 8:15 AM IST

नांदेड - देगलूर शहरातून तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारे अनेक रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

महाराष्ट्र, तेंलगणा व कर्नाटकाच्या सीमेवरील असलेल्या देगलूर तालुक्यातील अनेक गावांचा रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. तालुक्याला जोडणाऱ्या तमलूर, हिप्परगा, नरंगल, सुंडगी या गावजवळील रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून या गावांचे रस्ते जीवघेणे झाले आहेत.

चिखलमय रस्ते

सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेती कामाला वेग आले आहे. शेतीउपयोगी वस्तू घेऊन याच खड्डेमय रस्त्यावरून शेतकऱ्यांसह वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन अवघड प्रवास करावा लागत आहे. यामुळे शारीरिक व आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे लवकरात लवकर स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा - देगलूरमध्ये पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा 'वजीर' कोण?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.