ETV Bharat / state

मी त्या घोषणा ऐकल्याच नाहीत..! केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड - pritam munde

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. परळी येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे अंगार है.. बाकी सब भंगार है.. अश्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर मी त्या घोषणा ऐकल्या नाहीत अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.

bhagawat karad
bhagawat karad
author img

By

Published : Aug 17, 2021, 12:52 PM IST

Updated : Aug 17, 2021, 1:21 PM IST

नांदेड - जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कसलीही घोषणाबाजी झाली नाही. मी त्या घोषणा ऐकल्या नाहीत अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर कराड जनआशीर्वाद यात्रा काढत ते मराठवाड्याचा दौरा करत आहेत. जन आशीर्वाद यात्रे दरम्यान परळी येथे भाजपा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणा झाली होती. मात्र यावर भागवत कराड यांनी मी त्या घोषणा एकल्याच नाही अशी प्रतिक्रिया देत त्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न कराड यांनीं केला आहे.

घोषणा एकल्याच नाहीत

भागवत कराड यांचं नांदेडात जंगी स्वागत-
केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर देशभरात भाजपाकडून जनआशीर्वाद यात्रा काढली जात आहे. या पार्श्वभूमीवर भागवत कराड बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातील यात्रेनंतर लोहा येथे कराड यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तीन किलो वजन आणि चाळीस फूट लांबीचा हार घालून कराड यांच स्वागत करण्यात आलं. चक्क दोन जेसीबीच्या साहाय्याने हा हार घालण्यात आला. नांदेड शहरात देखील रात्री उशिरा त्यांनी आशीर्वाद यात्रा काढली. महापुरुषांच्या पुतळ्याचे दर्शन घेत हा दौरा काढण्यात आला.

परळी येथे झालेल्या घोषणा ऐकल्याच नाहीत - कराड
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान यावेळी अनेक समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. या नाराजीचे पडसाद कराड यांच्या जण आशीर्वाद दौऱ्यात पाहायला मिळाले. पंकजा मुंडे अंगार है.. बाकी सब भंगार है.. अश्या घोषणा नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे देखील कार्यकर्त्यांवर भडकल्या होत्या. नांदेड येथे आले असता कराड यांनी परळी येथे झालेल्या प्रकारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. मी त्या घोषणा ऐकल्या नाहिती. मला माहित सुद्धा नाही..आणि असा प्रकार झालाच नसल्याचं कराड म्हणाले.

हेही वाचा - राजस्थान:भीषण अपघातानंतर पेटले दोन ट्रेलर, चौघांचा होरपळून मृत्यू!

Last Updated : Aug 17, 2021, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.