नांदेड - मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत, आम्ही देखील मनापासून त्यांच्यासोबत आहोत, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. भोकर येथे विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
भोकर येथे १९४ कोटीच्या कामाचं भूमिपूजन-
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विकास कामांच्या भूमीपूजनाचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी सकाळी नांदेड येथील आसना पुलाचे भूमिपूजन करण्यात आलं. तर सायंकाळी भोकर येथे विकास कामांचा नारळ फोडला. हदगाव-तामसा-भोकर-उमरी-कारेगाव-लोहगाव या दुपदरी रस्ता, भोकर येथील विश्रामगृहांचे विस्तारीकरण, भोकर-मुदखेड राज्य महामार्गाचे बांधकाम, आय टी आय, १८०० मेट्रिक टन धान्य गोदमाचे बांधकाम, नगरपरिषदे अंतर्गत १४ कोटी कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.
खासदार चिखलीकरांवर टीका-
भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जुगार, दारु आणि मटक्याचे अड्डे चालवण्यात व्यस्त असल्याची टीका च नाव न घेता टीका केली. त्यांच्याकडे विकास कामे करायला वेळ नाही. आपण हे अवैध जुगार, दारु आणि मटक्याचे अड्डे उध्वस्त करणार असल्याचे ही चव्हाण म्हणाले.
मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपचे काही लोकं महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत. मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आम्ही सर्वजण राहू असा विश्वास चव्हाण यांनी दिला आहे.
हेही वाचा - 'बाळासाहेबांमुळेच भाजपा गावागावात पोहचली'
हेही वाचा - 'तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा' नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती