ETV Bharat / state

उद्या 45 वर्षांवरील लाभार्थ्यांनाच दुसरा डोस; प्रत्येक संस्थेसाठी 100 डोसेसची झाली उपलब्धता - नांदेड कोरोना बातमी

नांदेड जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांसाठी प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोसेस आज (दि. 12 मे) उद्या होणाऱ्या (13 मे) लसीकरणासाठी उपलब्ध झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 12, 2021, 10:25 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांसाठी प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोसेस आज (दि. 12 मे) उद्या होणाऱ्या (13 मे) लसीकरणासाठी उपलब्ध झाले आहेत. हे डोसेस ज्यांनी पहिल्यांदा घेतले आहेत व जे दुसऱ्या डोससाठी वाट पाहत आहेत, अशा प्रत्येकी 100 व्यक्तींना प्रत्येक केंद्रनिहाय देण्याचे नियोजन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. लसीकरण केंद्रावर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांनी गर्दी न करता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे.

लसीकरण कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. यात श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, असे एकूण 7 केंद्र आहेत. शहरी हद्दीत सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, असे एकूण 16 केंद्र आहेत. ग्रामीण हद्दीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू असून एकूण 67 केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. लसीकरणाच्या या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे. नांदेड जिल्ह्यात 11 मेपर्यंत एकूण 3 लाख 78 हजार 166 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा - नांदेडमध्ये 398 कोरोना बाधिातांची नोंद, 482 जण झाले कोरोनामुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.