नांदेड - जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी अचानक वादळी-वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या अवेळी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या आंब्याचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी या अवकाळी पावसामुळे अधिकच चिंतेत पडला आहे.
गुरुवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्याशा सरी बरसल्या तर वादळी-वाऱ्यासह काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे अनेकांच्या घराची पडझड झाली. अचानक पडलेल्या या पावसामुळे उष्णतेच्या उकाड्यात सापडलेल्या नागरिकांना काहीसा थंड गारवा मिळाल्यामुळे उकाड्यापासून बचाव झाला. जिल्ह्यातील विविध भागात पडलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.
या पडझडीमुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली. या हानीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत सापडला आहे. जिल्ह्याच्या भोकर, धर्माबाद, बिलोली, माहूर या तालुक्याच्या अनेक भागात हा पाऊस झाला