ETV Bharat / state

कोकणात वाहून जाणारे पावसाचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न; पालकमंत्री रामदास कदम - मराठवाडा पाऊस

दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. त्या पाण्याला मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मराठवाडा सध्या तहानलेलाच आहे, अनेक ठिकाणी पावसाच्या अतिरेकामुळे जीवित व वित्तहानी झाली. त्यातही मराठवाड्याने त्यांना मदतीचा हातभार दिला.

रामदास कदम
author img

By

Published : Aug 15, 2019, 11:36 PM IST

नांदेड - कोकणात पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्या संदर्भाने लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.ते गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहनासाठी आले होती. त्यावेळी बोलत होते.

दुष्काळी मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी लवकरच मोहीम - पालकमंत्री रामदास कदम

दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. त्या पाण्याला मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मराठवाडा सध्या तहानलेलाच आहे, अनेक ठिकाणी पावसाच्या अतिरेकामुळे जीवित व वित्तहानी झाली. त्यातही दुष्काळाने होणाऱ्या होरपळीला विसरून मराठवाड्याने त्यांना मदतीचा हातभार दिला. मराठवाड्यात सध्या असलेली पावसाची कमतरता लक्षात घेवून शासनाने पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करणाऱ्या लोकांना २० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले असल्याचेही कदम म्हणाले.

नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करण्याचे काम सुरू करण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना शाब्बासकी दिली. मराठवाड्यात असलेल्या कमी पावसामुळे ज्या समस्या उदभवतील त्या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने बाधित नागरिकांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी येथील दत्ता देशमुख, विजय देशमुख, विक्रांत देशमुख, बालाजी नरंगले तसेच पत्रकारांनी धनादेश दिले. ते धनादेश आज पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Intro:कोकणात अति प्रमाणात पडणारा पाऊस दुष्काळी मराठवाड्यात आणण्यासाठी लवकरच मोहीम-पालकमंत्री कदम...

नांदेड: कोकणात जास्त पडणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाला असून त्या संदर्भाने लवकरच कामाला सुरूवात होईल अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली. Body:कोकणात अति प्रमाणात पडणारा पाऊस दुष्काळी मराठवाड्यात आणण्यासाठी लवकरच मोहीम-पालकमंत्री कदम...

नांदेड: कोकणात जास्त पडणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाला असून त्या संदर्भाने लवकरच कामाला सुरूवात होईल अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील ७३ व्या स्वातंत्र्य दिवस समारोहात बोलत असतांना पालकमंत्र्यांनी कोकणात पडणारा पाऊस समुद्रात वाहुन जातो. त्या पाण्याला मराठवाड्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मराठवाडा सध्या तहानलेलाच आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या अतिरेकाने जीवित व वित्त हानी झाली. त्यातही मराठवाड्याने त्यांना मदतीचा हातभार दिला आणि आपल्या त्रासाला विसरले. मराठवाड्यात सध्या असलेली पावसाची कमतरता लक्षात घेवून शासनाने पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करणाऱ्या लोकांना २० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे.
नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करण्याचे काम सुरू झाले त्याबद्दल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना शाब्बासकी दिली. भारतात ७३ वर्षात पहिल्यांदा जम्मू काश्मिरमध्ये आज अमित शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आजपासूनच त्या ठिकाणी दिसू लागले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रामदास कदम यांनी धन्यवाद व्यक्त केले. मराठवाड्यात असलेल्या कमी पावसामुळे ज्या - ज्या समस्या उदभवतील त्या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ७३ व्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सर्व प्रथम पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस निरिक्षक शहादेव पोकळे यांनी आपल्या इतर सहकारी पोलीसांसह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहराज माळी यांची ध्वजस्तंभासमोर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अनेक स्वातंत्र्य सैनिक, खासदार, आमदार , अनेक स्थानिक पदाधिकारी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते . ध्वजारोहणानंतर अनेक पोलीस पदकप्राप पोलीसांचा सन्मान करण्यात आला . उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक संस्था , व्यक्ती , शाळा , महाविद्यालय यांचाही सन्मान करण्यात आला . स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेवून एक रॅली काढली. त्यात सर्वधर्मिय विद्यार्थी, विद्यार्थीनी. शिक्षक, शिक्षीका सहभागी झाल्या होत्या.
नांदेड शहरात अनेक इमारतींवर व्यक्तीगत स्तरावर ध्वजारोहण करण्यात आला . संपुर्ण शहरात उत्सवाचे वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने बाधित नागरिकांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येथील दत्ता देशमुख, विजय देशमुख, विक्रांत देशमुख, बालाजी नरंगले तसेच पत्रकारांकडून यावेळी धनादेश पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सुपूर्द केला. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.