ETV Bharat / state

बि-बियाणे खतासाठी शेतकर्‍यांना अनुदान द्या, खासदार चिखलीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

author img

By

Published : Apr 20, 2020, 12:45 PM IST

राज्य सरकारने खरीपाच्या पेरणीसाठी, बी-बियाणे व खतासाठी शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

mp Chikhlikar demand Chief Minister
खा.प्रतापराव पाटील-चिखलीकर

नांदेड - शेतकर्‍यावंर सतत कोसळणारे अस्मानी संकट त्यातच कोरोना विषाणूजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेली टाळेबंदी यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. राज्यशासनाने खरीपाच्या पेरणीसाठी शेतकर्‍यांना अनुदान द्यावे, अशी मागणी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

निसर्गाच्या लहरीपणाच्या अस्मानी व सुलतानी फटक्यातून शेतकरी सावरत असतांना कोरोना विषाणूजन्य आजाराचा फटका शेतकर्‍यांना बसताना दिसत आहे. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या संकटावर मात करतांना राज्यशासनाकडून शेतकर्‍याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. येणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन राज्यशासनाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठन करावे व शेतकर्‍यांना बी-बियाणे, औषधे आणि खतासाठी अनुदान द्यावे अशी मागणी एका पत्राव्दारे नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे.

यासोबतच फळपिका बरोबर भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचा विचार करावा शेतीमालाच्या विक्रीसाठी जिल्हयाच्या सिमा मोकळ्या कराव्यात. ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर राज्यात अडकलेल्या मजूरांना त्यांच्या गावी पोंहचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशीत करावे, अशा मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोरोना विषाणूजन्य आजारामुळे राज्यातील कृषी क्षेत्रापूढे निर्माण झालेल्या अडचणी आणि त्यावर उपाय याबाबत राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावे कृषी व पणन विभागाच्या नियोजन कारभाराचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला झाला असल्याचा आरोप खा.चिखलीकर यांनी केली आहे. लाखाचा पोशींदा असलेल्या शेतकर्‍यांना संकटकाळात राज्य सरकारने दिलासा देण्याची गरज असतांना त्यांच्याकडे पाठ फिरवली जात असल्याचे आपल्या पत्रात खा. चिखलीकरांनी नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.