नांदेड : पेरण्यानंतर झालेली अतिवृष्टी, तद्नंतर दुबार पेरणीला उघडीपचा फटका आणि दुबार पेरणीनंतर कसेबसे पीक हाती आले असताना परतीच्या पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिरावून नेला. त्यात कृषी विभागाच्या मागणीनुसार नव्या सरकारने जिल्ह्याला अनुदानपोटी ७१८ कोटी रुपये ( 718 crores subsidy to district by government ) वर्ग केलेले असतानाही अद्यापपर्यंत वाटप झालेली नाही.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान : अनुदानाची किती रक्कम वाटप झाली. किती शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. याबाबत प्रशासनदेखील अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांना वाटपही सुरू झाले नाही. त्यामुळे सदर रक्कम दिवाळीपूर्वी वाटप होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.
दुप्पट अनुदान देण्याची घोषणा : राज्यात सर्वाधिक नुकसानीचा आकडा नांदेड जिल्ह्याचा होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुप्पट अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार कृषी विभागाने नांदेड जिल्ह्यातील ५ लाख २७ हजार ४९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला. त्यासाठी तब्बल ७ लाख ४१ हजार १९४६ शेतकऱ्यांना ७१७ कोटी ८८ लाख ९१ हजार ६०० रुपये अपेक्षित निधीची मागणी केली होती. हा निधी राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे आणि त्यांच्याकडून तहसीलदार यांच्याकडे वर्ग करण्यात आला; परंतु जिल्ह्यातील अनुदान वाटप सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत केले जात आहे. बँकेकडील अपरे मनुष्यबळ आणि यंत्रणेअभावी रक्कम वाटपास खूप वेळ लागत आहे. जिल्हा मध्य बँकेमार्फत अनुदान वाटपास बहु शेतकरी तसेच शेतकरी संघट विरोधही दर्शविला होता; परंतु अनुदानाची रक्कम जिल्हा मध्य बँकांकडेच वर्ग करण्यात आली
तालुकानिहाय प्राप्त अनुदान (कोटीत)
नांदेड | २५,८९,५२००० |
अर्धापूर | २९,१६,५२००० |
कंधार | ५५,१२,६०००० |
लोहा | ६१,०५,०४००० |
देगलूर | ४२,९५,०४८०० |
मुखेड | ५४,७०,१९२०० |
बिलोली | ४०,३५,३९२०० |
नायगाव | ४५,०५,४७००० |
धर्माबाद | २९,५३,९८८०० |
उमरी | ४०, ११, ३२००० |
भोकर | ५२, ४३, ०७२०० |
मुदखेड | २४, २७, ०५६०० |
हदगाव | ८५,२०,२८००० |
हिमायतनगर | ४२,७४,०७२०० |
किनवट | ६७,०९,१५२०० |
माहूर | २२,२०,१९२०० |
एकूण ७१७,८८,९१६००
तक्रार करूनही बँका गती देईनात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईपोटी दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टर ऐवजी १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर मदत शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यासाठी जिल्ह्याला जवळपास ७१८ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. बँकांकडून अद्यापर्यंत शेतकयांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही, अशा तक्रारी आहेत.
हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिरावला जुलै महिन्यात पावसाने हाहाकार केला होता. काही तालुक्यांमध्ये तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने ओढे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. काही भागातील जमिनी स्वरहून गेल्या. बहुतांश ठिकाणी दुबार पेरणी करुन पुन्हा पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शर्तीचे प्रयत्नांना निसर्ग साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने बहुतांश तालुक्यात उघडीप दिल्याने पिके वाळली. त्यात काळ्या पाण्यावर जगविलेल्या पिकांना ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिरावून नेला.