ETV Bharat / state

गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा...! - नांदेड पाऊस बातम्या

माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 4,800 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पूर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून पूर्णा नदीत 11,600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग 37,100 क्युसेक्स आहे.

नांदेड
नांदेड
author img

By

Published : Sep 27, 2020, 8:31 PM IST

नांदेड - जायकवाडी प्रकल्पातून 18,900 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 4,800 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पूर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून पूर्णा नदीत 11,600 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग 37,100 क्युसेक्स आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. सद्यस्थितीत नांदेड शहरात पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.

नांदेड पूरपरिस्थिती

नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगण राज्यातील पोचमपाड धरण सुध्दा 98 टक्के भरले असून तेथून 1,50,000 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प 100 टक्के भरल्यास गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. सध्या विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडी प्रकल्पाचे पाणी पोहचले असून प्रकल्पाच्या 10 दरवाज्यातून 1,00,000 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. आवक वाढल्यास विसर्गात 1,50,000 क्युसेक्सपर्यंत वाढ करावी लागेल. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 348.46 मीटर आहे.

हेही वाचा - अतिवृष्टी : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रालाही साकडे घालू - कृषीमंत्री दादाजी भुसे

इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2,13,000 क्युसेक्स व धोका पातळीचा विसर्ग 3,09,774 क्युसेक्स आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प 100 टक्के भरला असून 12,000 क्युसेक्स विसर्ग पैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. याशिवाय उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्प 100 टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात विसर्ग नदी पात्रात सुरू आहे.

गोदावरी, पैनगंगा, पूर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षातून मिळू शकेल. त्यांचा दुरध्वनी क्रमांक 02462 263870 आहे.

हेही वाचा - भोपाळ : वडिलांसोबत ल्युडो खेळात हरल्यानंतर तरुणीची कौटुंबिक न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.