ETV Bharat / state

विघ्नहर्त्याचे घराघरात आगमन, कोरोना असला तरी उत्साहात नाही कमी - नांदेड गणपती स्थापना न्यूज

अराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे आज घराघरात आगमन होत आहे. बाप्पाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे. पुढील दहा दिवस उत्तरोत्तर उत्सव रंगत जाणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे बाजारात शुकशुकाट दिसत आहे. मात्र भक्तांमधील उत्साह कमी झालेला दिसत नाही.

Ganpati installation in nanded
Ganpati installation in nanded
author img

By

Published : Sep 10, 2021, 11:56 AM IST

नांदेड : अराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे आज घराघरात आगमन होत आहे. जिल्ह्यात कोरोना आणि ओल्या दुष्काळाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे. आज मंगलध्वनी, आरती आदी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. पुढील दहा दिवस उत्तरोत्तर उत्सव रंगत जाणार आहे. कोरोना आणि ओल्या दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी भक्त बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत आहेत.

विघ्नहर्त्याचे घराघरात आगमन,

कोरोनामुळे बाजारात शुकशुकाट

लाडक्या गणरायाचे आज शहरातील अनेक घरांमध्ये आगमन होत आहे. दिवसभर बाप्पासाठी घराघरात लगबग असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे बाजारात मर्यादित गर्दी असली तरी त्यात मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेकजण गणरायाची आवडती मूर्ती खरेदी करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वांनीच गणरायाच्या आगमनासाठी घरात सजावट केली आहे.

'श्री' च्या मूर्तीसह इतर साहीत्याने दुकानेही सजली

गणरायासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, मखर, विद्युतमाळा आदी वस्तूंनी दुकाने सजली आहेत. कोरोनाचे संकट असूनही बाजारांमध्ये गर्दी दिसून येत आहे. अनेक जण कालच गणरायाला घरी घेऊन गेले. मात्र दरवर्षीप्रमाणे वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे अनेकांनी टाळले. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती घरी आणली जात आहे. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळशी, पत्री आदी साहित्य अनेकजण खरेदी करत आहेत.

हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया : आज लाडक्या बाप्पासाठी झटपट 'असे' बनवा 'ड्राय फ्रूट' मोदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.