ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - अवघ्या 15 दिवसांत एकाच कुटुबांतील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

author img

By

Published : May 16, 2021, 6:53 PM IST

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील नाईकनगर येथील पार्डीकर कुटुंबामधील 4 जणांचा अवघ्या 15 दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका डॉक्टरचा देखील समावेश आहे.

15 दिवसांत एकाच कुटुबांतील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नांदेड - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहरातील नाईकनगर येथील पार्डीकर कुटुंबामधील 4 जणांचा अवघ्या 15 दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका डॉक्टरचा देखील समावेश आहे.

कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

44 वर्षीय डॉक्टर अनिल पार्डीकर यांच्यासह 78 वर्षांचे त्यांचे वडील काशीनाथ पार्डीकर, 70 वर्षीय आई कुसुम पार्डीकर आणि 50 वर्षीय मोठा भाऊ अतुल पार्डीकर यांचा कोरोनामुळे एका पाठोपाठ मृत्यू झाला आहे. 4 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालय बंद करण्याची वेळ

अनिल पार्डीकर हे बीएएमएस डॉक्टर होते. श्रीनगर येथे त्यांचे रुग्णालय देखील होते. त्यांच्या पत्नी प्रतिभा पार्डीकर ह्या फार्मासिस्ट असून त्या रुग्णालयाच्या बाजूला मेडिकल चावलत होत्या. डॉक्टरांच्या निधनाने रुग्णालय आणि मेडिकल बंद करण्याची वेळ या कुटुंबीयांवर आली आहे.

कुटुंब प्रमुख व्यक्तींच्या मृत्यूने घराचा आधार हरवला

पार्डीकर कुटुंबात एकूण दहा सदस्य होते, अनिल पार्डीकर यांना पत्नी आणि दोन मुले, तर शिक्षक असलेल्या त्यांच्या भावाला पत्नी आणि दोन मुली तसेच आई आणि वडील असा दहा जणांचा परिवार होता. मात्र आता घऱातील प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाल्याने पार्डीकर यांच्या कुटुंबाचा आधारच हरवला आहे. अवघ्या 15 दिवसांत कुटुंबातील चार सदस्य कोरोनाने गमावल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.