नांदेड - जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचे केंद्र सरकारमध्ये तसेच अनेक पदे भूषविलेले माजी राज्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटुरकर यांचे कोरोनाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गंगाधरराव कुंटुरकर यांचा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक वर्षे प्रभाव राहिला. काँग्रेस, राष्ट्रवादी व काही वर्षांपूर्वी ते भाजपवासी झाले होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात कुंटुरच्या सरपंचपदापासून झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा बँकेचे संचालक तसेच राज्य सहकारी बँकेचे संचालक अशी अनेक पदे त्यांनी भूषविली.
हेही वाचा-कोरोनामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करत आहे - जयंत पाटील
जिल्ह्याच्या राजकारणात होता मोठा दबदबा-
जिल्ह्याच्या राजकारणावर गंगाधरराव कुंटुरकर यांचा मोठा दबदबा राहिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ते उभे होते. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याकारणामुळे ते मतदानाला हजर राहू शकले नव्हते. 3 एप्रिलला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली. अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा-मनसे शाखाध्यक्षाची राष्ट्रवादी नेत्याच्या सांगण्यावरून हत्या ; शूटरचा खुलासा