ETV Bharat / state

लाकूड तस्करांचा वनपालावर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल - Foresters news

चिखली बीटमधील हाटकरखोरीच्या जंगलात वनपाल सिद्धार्थ वैद्य यांच्यावर लाकूड तस्करांनी कुऱ्हाडीने हल्ला करून जंगलात पळ काढला.

किनवट पोलीस स्टेशन
किनवट पोलीस स्टेशन
author img

By

Published : Aug 19, 2020, 10:14 PM IST

नांदेड - किनवट लाकूड तस्करीसाठी अतीसंवेदनशिल संबोधल्या गेलेल्या चिखली बीटमधील हाटकरखोरीच्या जंगलात वनपाल सिद्धार्थ वैद्य यांच्यावर लाकूड तस्करांनी कुऱ्हाडीने हल्ला करून जंगलात पळ काढला. या प्रकरणी किनवट पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. लाकूड तस्करांविरुद्ध वन गुन्ह्याचीही नोंद करण्यात आली. ही घटना आज (१९ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

किनवट वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यकक्षेतील चिखली बु. बिटमध्ये १९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता वनपाल सिद्धार्थ मिलींद वैद्य हे प्रदीप यादव तामगाडगे, लक्ष्मण नागोराव शिंदे या वनमजुरांसोबत हाटकरखोरीच्या जंगलात गस्तीवर होते. लाकूड तस्कर सागवान झाडाची तोड करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तस्करांना झाड तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या तस्करांनी वनपाल वैद्य यांच्या हातावर कु-हाडीने वार करुन पोबारा केला.

चिखली बीट हे अतिसंवेदनशिल क्षेत्र संबोधल्या गेले आहे. तस्करांनी पोबारा करण्यापूर्वी लाकूड कापण्याचे साहित्य घटनास्थळीचं सोडून गेले. सदरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. जवळपास पाच तस्करांचे टोळके असल्याचे समजते.

तस्करांविरुद्ध वनगुन्ह्याची नोंदही करुन किनवट पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. असे प्राणघातक हल्ले अनेकदा घडले. मात्र कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी वनमंत्रालयाने ठोस उपाय योजना करताना दिसत नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.