ETV Bharat / state

वनविभागाकडून वृक्षतोड रोखण्यासाठी कारवाईचा बडगा; मोठा साठा जप्त

वनविभागाने अतिक्रमण व वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. नांदेड जिल्ह्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील 298 बीट क्रमांकामध्ये अतिक्रमण झालेल्या ठिकाणाहून मोठा साठा असलेली लाकडे जप्त केली आहेत.

author img

By

Published : Jun 19, 2020, 6:23 PM IST

Updated : Jun 19, 2020, 8:31 PM IST

forest department seized timber stocks from the encroached area
वनविभागाकडून वृक्षतोड रोखण्यासाठी कारवाईचा बडगा; मोठा साठा जप्त....

नांदेड - वनविभागाने अतिक्रमण व वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे. नांदेड जिल्ह्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील 298 बीट क्रमांकामध्ये अतिक्रमण झालेल्या ठिकाणाहून मोठा साठा असलेली लाकडे जप्त केली आहेत. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या भुखंड माफियामध्ये चांगलीच खळबळ उडाली. वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास खरात यांनी ही कारवाई केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी विलास खरात.
किनवट वनविकास महामंडळा अंतर्गत येणाऱ्या शिवणी येथिल बीट क्रमांक 298 कक्ष जंगलामध्ये भूखंड माफियांनी शेकडो एकर जंगलावर अतिक्रमण करून शेतीलायक जमीन करण्यासाठी मौल्यवान सागवनाच्या जिवंत झाडाची तोड केली होते. तसेच त्या ठिकाणी अतिक्रमण करत असल्याची गुप्त माहिती वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विलास खरात यांना मिळताच त्यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अतिक्रमण भूखंड माफियांनी तेथून पळ काढला. सदरील घटनेची माहिती वनविकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकास दिली. तसेच शिवणी अप्पारापेठ रोडलगत असलेल्या जंगलात अतिक्रमण केलेल्या ठिकाणाहून वन कर्मचाऱ्यांनी मौल्यवान किंमतीचे दोन ट्रॅक्टर आणि माल जप्त केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विलास खरात यांनी दिली.

Last Updated : Jun 19, 2020, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.