ETV Bharat / state

नांदेडसाठी दिलासा; पहिल्या कोरोना रुग्णाचा प्रथम तपासणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह

author img

By

Published : Apr 28, 2020, 10:07 AM IST

दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी पिरबुऱ्हाण नगर मधील पहिल्या रुग्णाची पुन्हा तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यासोबतच सदरील रुग्णावर गेल्या पाच ते सहा दिवसापासून उपचार करण्यात आले होते. तपासणीसाठी पुन्हा स्वॅब पाठवण्यात आले होते. त्याचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड

नांदेड - सहा ते सात दिवसाच्या उपचारानंतर पिरबुर्‍हाण येथील कोरोना रूग्णाचा प्रथम तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुन्हा एकदा 14 दिवसानंतर म्हणजेच 5 ते 6 तारखेदरम्यान तपासणी होणार आहे, अशी माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी पिरबुऱ्हाण नगर मधील पहिल्या रुग्णाची पुन्हा तपासणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यासोबतच सदरील रुग्णावर गेल्या पाच ते सहा दिवसापासून उपचार करण्यात आले होते. तपासणीसाठी पुन्हा स्वॅब पाठवण्यात आले होते. त्याचा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला आहे. चौदा दिवसानंतर पुन्हा स्वॅब पाठवण्यात येणार आहे. या रुग्णाला बीपी, शुगर आणि दमा हे आजार आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून देण्यात आली आहे. मंगळवारी पाठवण्यात आलेल्या एकूण संशयिताचे स्वॅबपैकी 41 लोकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 12 लोकांचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारची नवी रणनीती, त्रीस्तरीय केंद्रांतून होणार उपचार

तर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सोमवारी कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८५९० झाली आहे. तर ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.