ETV Bharat / state

Nanded Crime: नांदेडमध्ये पुन्हा व्यापाऱ्यावर गोळीबार; आरोपी बाप अन् मुलगा पोलिसांना शरण - Firing Again in Nanded life

जुन्या वादातून शुक्रवारी भरदिवसा नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडली. जुना मोंढा भागातील शारदा टॉकिज रोडवर उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळी झाडल्यानंतर आरोपी बाप अन् अल्पवयीन मुलगा आपणहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

Nanded Crime
पुन्हा व्यापाऱ्यावर गोळीबार
author img

By

Published : Feb 4, 2023, 9:31 AM IST

नांदेड: नांदेडला गोळीबाराची घटना तशी नवी नाही. गावठी पिस्तूल सापडण्याचे प्रमाणही अधिक आहे. जानेवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ता सविता गायकवाड हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने स्वतवर गोळी झाडून दोघांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नांदेडात गोळीबाराची घटना घडली नव्हती. उलट पोलिसांनी अनेकांकडून गावठी पिस्तूल जप्त केले होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वर्दळीच्या असलेल्या जुना मोंढा परिसरात गोळीबार झाला. सचिन कुलथे राहणार गाडीपुरा हा तरुण शारदा टॉकिज रस्त्यावर उभा होता. दुचाकीवरून आलेल्या गजानन बालाजी मामीलवाड याने त्यांच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी कुलथे यांच्या दंडातून आरपार गेली. त्यामुळे ते जागेवर कोसळले.

स्वताहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर: यावेळी आरोपी मामीलवाड याने सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले होते. त्यानंतर आरोपी बाप-लेक स्वताहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन जखमी कुलथे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपी मामीलवाड याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात एकच खळबळ उडाली होती.

अल्पवयीन मुलालाही अडकविले: जखमी सचिन कुलथे आणि आरोपी गजानन मामीलवाड यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. गजानन मामीलवाड याने कुलथेचर गोळीबार करण्यासाठी सोबत दोन गावठी पिस्तूल आणि पाच राऊंड घेतले होते. तसेच दुचाकीवर सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले. कुलथे यांच्यावर त्यातील एक गोळी झाडली. परंतु या प्रकरणात आपल्या अल्पवयीन मुलालाही अडकविले आहे.

तलवारीने एकमेकांवर हल्ला: काही वर्षांपूर्वी पैशाच्या देवाण- घेवाणीतून सचिन कुलथे आणि गजानन मामीलवाड यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर तलवारीने हल्ला केला होता. या प्रकरणात इतवारा ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच काही दिवसापूर्वी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्यानंतर मामीलवाड याने कुलथे याच्यावर गोळीबार केला. दरम्यान कुलथे यांच्यावर मामीलवाड याने गोळीबार केल्यानंतर कुलथे हे जीवाच्या भितीने पळत सुटले होते. त्यानंतर त्यांनी एका घरात आसरा घेतला. यावेळी आरोपीने त्याच्या दिशेने दगडफेकही केली. पळाल्यामुळेच कुलथे यांचा जीव वाचला.

हेही वाचा: Nanded Crime नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार काँग्रेसच्या महिलेवर कार्यकर्त्यावर केला जीवघेणा हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.