ETV Bharat / state

दैव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!

मुंबई येथील महिला भाविकांना माहूर गडावर घेऊन जाणाऱ्या धावत्या बसच्या चाकाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, चालकाने प्रसंगावधान बाळगत माहूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला तत्काळ संपर्क साधला.

बसला लागलेली आग विझवताना
बसला लागलेली आग विझवताना
author img

By

Published : Dec 29, 2019, 10:37 PM IST

नांदेड - माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थानाजवळ धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

बसला लागलेली आग विझवताना
बसला लागलेली आग विझवताना

नाताळाच्या सुट्ट्या असल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथे भाविकांची गर्दी होत आहे. मुंबई येथील महिला भाविकांना घेऊन एक खासगी बस माहूर गडावर जात होती. अचानक धावत्या बसच्या चाकाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, चालकाने प्रसंगावधान बाळगत माहूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला तत्काळ संपर्क साधला.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात; 3 ठार 1 गंभीर जखमी

नगर पंचायतीचा अग्निशामक बंब काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाला. यानंतर चालक मन्सूर शेख, स्वच्छता दूत गणेश जाधव आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

Intro:नांदेड : देव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!

माहूर गडावरील घटना !

माहूर:- माहूरगडावरील दत्त शिखर संस्थान जवळ अचानक धावत्या खाजगी ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत देव बलवत्तर म्हणून पन्नास भाविकांचे प्राण वाचले. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.Body:नाताळ सणाच्या सुट्ट्या असल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथे सध्या भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. अशातच मुंबई येथील महिला भाविकांना घेऊन एक खाजगी बस माहूर गडावरील देव देवतांचे दर्शन घेण्यासाठी जात होती. दरम्यान अचानक धावत्या बस च्या चाकाने पेट घेतल्यामुळे खासगी बसच्या आत मध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंग सावधानता बाळगत ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाच्या सहाय्याने माहूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलास तात्काळ संपर्क साधले.Conclusion:
नगर पंचायतीचे अग्नीशमन बंब काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचल्याने चालक मन्सूर शेख, स्वच्छता दूष गणेश जाधव व अन्य कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून अप्रिय घटना घडण्याच्या पूर्वीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून देव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हल्स मधील सर्वच प्रवाशांचे प्राण वाचले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.