ETV Bharat / state

नांदेडमध्ये मास्क न लावणाऱ्यांकडून तीस हजाराचा दंड वसूल

सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नांदेडवासियांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.

nanded municipal corporation
नांदेडमध्ये मास्क न लावणाऱ्यांकडून जवळपास तीस हजाराचा दंड वसूल
author img

By

Published : Jun 10, 2020, 2:59 PM IST

नांदेड - शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत तोंडाला मास्क न लावता हिंडणाऱ्यांकडून महानगरपालिकेच्या पथकाने मंगळवारी २९ हजार 800 रूपयांचा दंड वसूल केला आहे. नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले यांच्या नियंत्रणाखाली मनपाच्या ६ क्षेत्रीय कार्यालयात ६ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

पथकातील अधिकारी व कर्मचारी दिवसभर शहरात फिरून नियमभंग करणाऱ्या तसेच मर्यादेपेक्षा जास्त वेळ दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून, सुरक्षित शारीरिक अंतर न राखणाऱ्या, मास्क न लावणाऱ्या मंडळींकडून दंड वसूल करत आहेत. मंगळवारी मनपाच्या पथकांनी शहरातील विविध भागात फिरून तोंडाला मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला. सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने नांदेडवासियांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.