ETV Bharat / state

हृदयदावक : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीने मुलीचा छळ केल्याने वडिलांची आत्महत्या; दुःख सहन न झाल्याने मुलीनेही सोडला प्राण - father suicide

मुलीच्या सासच्यांची मागणी पुर्ण करू शकत नाही, या भावनेतून देगलूर येथील शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या (Father commits suicide) केली होती. त्यानंतर वडिलांनी केलेल्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने मुलीनेही वडिलांशेजारीच आपला प्राण (Father commits suicide after girl also gave up her life in Denglur) सोडला.

Father commits suicide
मुलीचा छळ केल्याने वडिलांची आत्महत्या;
author img

By

Published : Nov 18, 2021, 4:26 PM IST

Updated : Nov 18, 2021, 7:44 PM IST

नांदेड - गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी मुलीचा तिच्या सासरकडून होत छळ पाहून मुलीच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल (बुधवार) घडली होती. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे घडली होती. वडिलांनी आपल्यामुळे आत्महत्या केली हे दुःख सहन न झाल्याने मुलीनेही त्यांच्या शेजारी प्राण सोडले त्याचा हृदयदावक घटना घडली होती.

आठ महिन्यापूर्वी झाला होता विवाह -

देगलूर तालुक्यातील सुगाव येथील शंकर भोसले यांनी माधुरी हिचा विवाह आठ महिन्यापुर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजेशी लावून दिला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी पाच लाखाची मागणी माधुरीकडे करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागले. माधुरीने ही बाब वडील शंकर भोसले यांना सांगितली.

वडिलांच्या मृता शेजारीच मुलीने प्राण सोडले -

शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीचे लग्न कर्ज काढून केले होते, ते कर्ज फिटले नाही. आता पाच लाख कुठून आणू म्हणून चिंतेत होते. काल रात्री मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचे दुःख माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडीलांच्या मृतदेहाची शेजारीच प्राण सोडले.

सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल -

मयत शंकर भोसले यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारी वरुन पती संदीप वडजेसह माधुरीच्या सासरच्या पाच जणांना विरोधात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ST Strike.. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 'त्या' एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; बुलडाण्यातील कर्मचारी संतप्त

Last Updated : Nov 18, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.