ETV Bharat / state

शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसह खताची कमतरता भासू देणार नाही - अशोक चव्हाण - ashok chavan minister decision

शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, औषधे आणि खतांचा वेळेवर पुरवठा होणार आहे. तसेच बियाणे आणि खताची कमतरताही भासणार नसल्याचे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Ashok Chavan
शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसह खतांची कमतरता भासू देणार नाही - अशोक चव्हाण
author img

By

Published : Apr 24, 2020, 6:14 PM IST

नांदेड - शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, औषधे आणि खताचा वेळेवर पुरवठा होणार आहे. तसेच बियाणे आणि खतांची कमतरताही भासणार नसल्याचे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज (शुक्रवारी) आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहातील कॅबिनेट हॉल येथे बैठकीत ते बोलत होते. ही बैठक पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

चव्हाण म्हणाले की, मागील वर्षातील पीक विमा मंजूरी बाबत असलेल्या तफावतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याबाबत खासदार-आमदार यांनी विविध सूचना केल्या. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महसूल जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची समिती नेमणार आहे. तसेच या संदर्भात सर्व आमदार-खासदार यांच्या सूचना विचारात घेऊन अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीबाबत अहवाल सादर करावा. जेणेकरून राज्य शासनामार्फत त्याबाबत आवश्यक निर्णय घेता येईल, अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.

खते, बियाणे विक्रीचे लॉकडाऊन कालावधीमध्ये वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेश काढण्याबाबत निर्देशित केले. राज्य शासनाकडून डीएपी खताचे नियतन कमी मंजूर झाल्यामुळे वाढीव २४ हजार मेट्रिक टन नियतन प्राप्त करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर आमदार राजेश पवार आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, कृषी सभापती रावणगावकर, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड, जिल्हा उपनिबंधक फडणवीस, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश पठारे आदी विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.