नांदेड - जिल्ह्यातील शेवडी बाजीराव थल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आत्मदनाचा इशारा दिला आहे. शंभर टक्के ओलिताखाली असलेल्या या गावातील सर्वच शेतकऱ्यांनी विद्युत बिलांचा वेळेवर भरणा केला. मात्र येथील शिवारातील कृषीपंपाला 24 तासांपैकी अवघा एक ते दोन तासच विद्युतपुरवठा होत आहे. याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खर्चिक प्रयोग
पाणी असूनही विजेअभावी पीके वाळून जात आहेत. उन्हाळी पिकांना वाचवणे अशक्य बनले आहे. मुबलक पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी येथील पिके वाळून जात आहेत. काही शेतकरी जनरेटर आणि इंधन पंपाचा वापर करून पिके वाचवण्याचा खर्चिक प्रयोग करत आहेत. मात्र त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मनुष्यबळ अपुरे
लोहा तालुक्यातील सोनखेड उपविभागात महावितरणच्या कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे, त्यातून महावितरणच्या अनागोंदीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.