ETV Bharat / state

शेतकऱ्यांनी 'बांबू मिशनचा' लाभ घ्यावा; खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन - नांदेड बांबू मिशन बातमी

पाशा पटेल यांनी केंद्र शासनाची 'बांबू मिशन' ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी पुढाकार घेतला असून शेतकऱ्यांनी या 'बांबू मिशनचा' लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

farmers-should-take-advantage-of-bamboo-mission-said-hemant-patil-in-nanded
शेतकऱ्यांनी 'बांबू मिशनचा' लाभ घ्यावा; खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन
author img

By

Published : Dec 1, 2020, 9:10 PM IST

नांदेड - सदैव शेतकऱ्यांचे हीत डोळ्यासमोर ठेवून कार्यतत्पर असणाऱ्या शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या 'बांबू मिशन'चा सर्व शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बांबू शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. आगामी काळात शेतकऱ्यांसमोर फळबाग, फुलशेती सोबतच बांबू शेती हा उत्तम पर्याय असून बांबूचे उत्पादन आणि संगोपन ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. हदगाव येथे आयोजित बांबू उत्पादन कार्यशाळेत ते बोलत होते.

आगामी काळात बांबूचे उत्पादन महत्त्वाचे -

खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना येणाऱ्या काळात हळद, ऊस, कापूस या नगदी पिकांसोबतच बांबू पिंकाचे उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात फळबाग, फुलशेती बरोबरच बांबू लागवड हा पर्याय शेतकऱ्यांपुढे असेल यात दुमत नाही. बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू बनविता येतात. बांबूचा उपयोग प्लायवूड, कागद आणि जैवइंधनासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तसेच दैनंदिन वापरात बांबूपासून बनविलेल्या अनेक वस्तू उपयोगात आणल्या जात आहेत.

मेंढा गावाची जगभरात ओळख -

विदर्भातील मेंढा (लेखा) या गावाने बांबू उत्पादनात देशातच नव्हे, तर जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण गाव बांबूपासून बनविलेल्या वस्तू आणि उत्पादनावर कोट्यवधींची उलाढाल करत आहे. मोठ्या प्रमाणात बांबू शेती करून या गावाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असून त्याच उद्देशाने शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केंद्र शासनाची 'बांबू मिशन' ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी बांबूच्या रोपाचे संकरित बियाणे तयार करण्यासाठी २५ लाख रुपयाची अद्यावत प्रयोगशाळा तयार केली आहे. आजपर्यंत २५ लाखांच्यावर बांबू रोपे वाटप केले आहेत. या मिशनचा हदगाव तालुक्यासोबतच नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा, मराठवाडा आणि विदर्भावर असलेला आत्महत्येचा कलंक प्रगत शेतीच्या माध्यमातून पुसण्यास थोड्याफार प्रमाणात का होईना मदत होईल, असेही हेमंत पाटील म्हणाले.

हेही वाचा - साईभक्तांना सभ्यतापूर्ण पोषाखात दर्शनाला येण्याचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.