नांदेड- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला. मात्र, यावर अर्धापूर येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ३० वर; संवेदनशील भागातील परिस्थिती नियंत्रणात
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत सोनखेड (ता.लोहा) येथील 261 व कामठा येथील 162 शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने सरसकट कर्जमाफी न देता नियम, अटी यात शेतकऱ्यांना अडकवून टाकले आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी बॅंकेत फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले.