ETV Bharat / state

'शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी नितीन गडकरींना कृषीमंत्री करा' - नांदेड

नितीन गडकरींनी आतापर्यंत ज्या-ज्या खात्यांमध्ये काम केले, त्या खात्यांचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यामुळे त्यांना कृषीमंत्री करावे, असे वक्तव्य शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.

नितीन गडकरी
author img

By

Published : May 29, 2019, 3:29 PM IST

नांदेड - नितीन गडकरी यांना देशाचे कृषीमंत्री करा, असे वक्तव्य शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे. गडकरी कृषीमंत्री झाले तर शेतीचे अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी होतील, असे ते यावेळी म्हणाले.

प्रल्हाद इंगोले

कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटामुळे शेती हा व्यवसायच अडचणीत आला आहे. त्यामुळे या गंभीर संकटातून शेती आणि शेतकरी यांना वाचवण्यासाठी गडकरी यांना देशाचे कृषीमंत्री केले पाहिजे. तसेच आज घडीला देशातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असून शेती समोर फार मोठे संकट निर्माण झाले आहे. हताश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळला आहे. हे या देशाचे दुर्दैव आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशाच्या कृषी खात्याला इतर अनेक खात्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी गडकरी यांच्या सारका धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता मिळणे गरजेचे आहे, असे इंगोले म्हणाले.

भाजपमध्ये आज घडीला वजन असलेला आणि शेती प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे नितीन गडकरी आहेत. आतापर्यंत त्यानी ज्या-ज्या खात्यांमध्ये काम केले, त्या खात्यांचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. आता त्यांच्यासारख्या नेत्याची कृषी खात्याला आणि देशातील शेतकऱ्यांना गरज आहे. त्यामुळे भाजपच्या देशपातळीवरील नेतृत्वाने आणि राज्यातील नेतृत्वाने गडकरींची शिफारस करुन त्यांना देशाचे कृषी खाते दिले तर भविष्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असेही इंगोले यावेळी म्हणाले.

Intro:शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी नितीन गडकरीना कृषिमंत्री करावे - प्रल्हाद इंगोले

नांदेड : कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटामुळे शेती हा व्यवसायच अडचणीत आला आहे. त्यामुळे या गंभीर संकटातून शेती आणि शेतकरी यांना वाचवण्यासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना देशाचे कृषिमंत्री केले तर शेतीचे अनेक प्रश्न मार्गी लागतील शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी अपेक्षा शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाची सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली .
Body:शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी नितीन गडकरीना कृषिमंत्री करावे - प्रल्हाद इंगोले

नांदेड : कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटामुळे शेती हा व्यवसायच अडचणीत आला आहे. त्यामुळे या गंभीर संकटातून शेती आणि शेतकरी यांना वाचवण्यासाठी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना देशाचे कृषिमंत्री केले तर शेतीचे अनेक प्रश्न मार्गी लागतील शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी अपेक्षा शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाची सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली .

कुणी काहीही म्हटले तरी आजघडीला देशातील शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असून शेती समोर फार मोठे संकट निर्माण झाले आहे. हताश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळला आहे हे या देशाचे दुर्दैव अाहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशाच्या कृषी खात्याला इतर अनेक खात्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी व धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता असणारा ताकतिचा व निर्भीड काम करणारा नेता मिळणे गरजेचे आहे. आजघडीला भाजपमध्ये वजन असलेला व शेती प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे नितीन गडकरी आहेत. आतापर्यंत त्यानी ज्या-ज्या खात्यांमध्ये काम केले त्या खात्यांचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे . आता त्यांच्यासारख्या नेत्याची कृषी खात्याला व देशातील शेतकऱ्यांना गरज आहे. भाजपच्या देशपातळीवरील नेतृत्वाने व राज्यातील नेतृत्वाने नितीन गडकरी साहेबांची शिफारस करून त्यांना देशाचे कृषी खाते दिले तर भविष्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण नक्कीच कमी होईल. नितीन गडकरी साहेबांची कल्पकता त्यांची काम करण्याची पद्धत, धडाडीचे निर्णय क्षमता या सर्व बाबींची शेती श्रेत्राला नितांत आवश्यकता आहे. भाजप नेतृत्वाने गडकरी साहेबांना कृषिमंत्री केल्यास शेतीत अमुलाग्र बदल होऊन उत्पादन खर्चावर आधारीत दीडपट हमीभाव असेल' शेतकऱ्याला कर्जमुक्त करून शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही.असे झाल्यास भारत हा खर्‍या अर्थाने कृषी प्रधान देश आहे असे म्हणता येईल. या देशातील शेतकरीही सन्मानाने जगेल. अशी अपेक्षा शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य पडला इंगोले यांनी भाजपा नेतृत्वाकडून व्यक्त केली आहे.
-----------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.