ETV Bharat / state

बोळेगाव शिवारातील 'जलयुक्त'चा बंधारा निकृष्ट; बिल काढण्याची 'लगीनघाई' - बिल

बिलोली तालुक्यातील बोळेगाव शिवारात शासनाने जलयुक्त शिवार योजनेतून लाखो रुपये खर्च करून गावाशेजारील नदीवर तीन बंधारे बांधण्यात येत आहेत. मात्र या बधाऱ्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

बंधारा
author img

By

Published : May 18, 2019, 11:51 AM IST

नांदेड - बिलोलीतील बोळेगाव शिवारात जलयुक्त शिवार योजनेतून लाखो रुपये खर्च करून तीन बंधारे बांधण्यात येत आहेत. मात्र हे बंधारे निकृष्ठ असून केवळ बिल उचलून घेण्याची जणू लगीनघाई ठेकेदारांकडून चालवली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बंधारा

बिलोली तालुक्यातील बोळेगाव शिवारात शासनाने जलयुक्त शिवार योजनेतून लाखो रुपये खर्च करून गावाशेजारील नदीवर तीन बंधारे बांधण्यात येत आहेत. मात्र शासनाच्या मुळ हेतू प्रमाणे येथे काम होत नाही. संबंधित ठेकेदारांकडून या बंधाऱ्यासाठी अत्यल्प सिमेंटचा वापर होतो. रेतीसाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता ज्या ठिकाणी बंधारा बांधण्यात येत आहे, त्या नदीतीलच जाड वाळूचा, मातीचा वापर होत आहे. बंधारा बांधकामाच्या आसपास दूरदूरवर पाणी उपलब्ध नसल्याने पाण्याचाही वापर होत नाही. हे काम संबंधित तलाठी, मंडळाधिकारी यांच्याअंतर्गत नसल्याने यांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. यांच्या प्रमाणेच ग्रामापंचायतही ठेकेदाराशी आर्थिक संबंध साधून या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या कामासाठी नेमण्यात आलेले अभियंताही चिरीमिरीच्या लालसेने फक्त औपचारिकता पूर्ण करून अप्रत्यक्षपणे ठेकेदाराची भलावण करण्यातच धन्यता मानत आहेत. यामुळे या बांधकामाचा दर्जा ढासळलाच पण ठेकेदाराच्या हातात बिल पडेपर्यंतही हा बंधारा टिकतो की नाही, अशी शंकाच आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हे बांधकाम थांबवून बिल अदा करू नयेत, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून होत आहे.

Intro:नांदेड - बोळेगाव शिवारातला जलयुक्त चा बंधारा निकृष्ट
सिमेंट , पाण्याचा अत्यल्प वापर करुन बिले काढण्याची लगीन घाई

नांदेड : बिलोलीतील बोळेगांव शिवारात जलयुक्त शिवार या योजनेतुन लाखो रुपये खर्च करून तीन ठिकाणी बांधण्यात येणारे बंधारे हे केवळ थातुर मातुर करुन बिले उचलुन घेण्याची जणु लगीनघाई ठेकेदारांकडुन चालवली जात आहे.Body:बिलोली तालुक्यातील बोळेगाव शिवारात शासनाच्या पाण्याचे संचय व्हावे व त्याचा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात लाभ व्हावा या उदात्त हेतुने शासनाने जलयुक्त शिवार योजनेतुन लाखो रुपये खर्च करून गावा शेजारील नदीवर तिन तिन बंधारे बांधण्यात येत आहेत.माञ शासनाच्या मुळ हेतु प्रमाणे इथे काम होत नाही. संबंधित ठेकेदारांकडुन या बंधा-यासाठी अत्यल्प सिमेंटचा वापर होतो.रेती साठी कुठल्याही प्रकारची रायल्टी न भरता ज्या ठिकाणी बंधारा बांधण्यात येत आहे.त्या नदीतल्याच जाड वाळुचा, मातीचा वापर होतो . बंधारा बांधकामाच्या आसपास दुरदुरवर पाणी उपलब्ध नसल्याने पाण्याचाही वापर होत नाही.हे काम संबंधित तलाठी , मंडळाधिकारी यांच्या अंतर्गत नसल्याने यांचेही याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.यांच्या प्रमाणेच ग्रामापंचायतही ठेकेदाराशी आर्थिक संबंध साधून या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे.Conclusion:
तर या कामासाठी नेमण्यात आलेले अभियंता ही चिरीमिरीच्या लालसेने फक्त औपचारिकता पुर्ण करुन अप्रत्यक्षपणे ठेकेदाराची भलावण करण्यातच धन्यता मानत आहेत.तर दुसरीकडे या बंधारा कामाचा ठेकेदार बिले काढण्यासाठी थातुरमातुर कामे उरकुन बिले काढण्याची जणु घाई करीत आहे.यामुळे या बांधकामाचा तर दर्जा ढासळलाच पण ठेकेदाराच्या बिले हातात पडे पर्यंतही हा बंधारा टिकतो की नाही की अशी शंकाच आहे.संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन हे बांधकाम थांबवुन बिले अदा करु नयेत अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थातून होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.