नांदेड - 'देशातील व महाराष्ट्रातील तरूण, शेतकरी, कष्टकरी कामगार अशा सर्वांच्या जीवनामध्ये हा गणेशोत्सव आनंद घेऊन यावा. महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत: मराठवाड्यामध्ये कमी पावसामुळे दुष्काळाचं जे संकट उभं ठाकलंय ते दूर व्हावं', अशी प्रार्थना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी केली आहे.
दरवर्षी प्रमाणे नांदेड शहरातील शिवाजीनगरच्या निवासस्थानी ढोल ताशांच्या गजरात त्यांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी सर्व चव्हाण कुटूंबीयांनी एकत्र येऊन गणेशाच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आ.अमिता चव्हाण, त्यांच्या मुली श्रीजया-सुजया यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.