नांदेड - पावसाळा सुरू झाला तरीही नांदेडमध्ये अद्याप नालेसफाई झालेली नाही. शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरून दरवर्षी मोठे नुकसान होते, त्या भागातील साफसफाईला अद्याप सुरुवात झालेली नाही.
नालेसफाई केली नसल्यामुळे आताच शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ झालेली आहे. मात्र, तरीही नांदेड महापालिकेला नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वच भागातील मोठे नालेही तुंबलेले आहेत, त्यामुळे एखाद्या मोठ्या अवकाळी पावसाने देखील नांदेडमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरू शकते. त्यामुळे पालिकेने युद्धपातळीवर नालेसफाई कडे लक्ष द्यावे, अशी मागणी शहरातील दत्तनगर आणि विष्णूनगर या भागातील नागरिकांनी केली आहे.
पावसाळा सुरू झाला तरीही नांदेडमध्ये नालेसफाई नाही, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ - Nanded rain news
नांदेड शहरातील सर्वच भागातील मोठे नाले तुंबलेले आहेत. यामुळे शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ झालेली आहे.
![पावसाळा सुरू झाला तरीही नांदेडमध्ये नालेसफाई नाही, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ Nallas and gutters in Nanded](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:38-mh-ned-04-nandedmadhyenalesafainahi-foto-vis-7204231-03062020191057-0306f-1591191657-741.jpg?imwidth=3840)