ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 20 एप्रिलपासून अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11पर्यंतच सुरू

author img

By

Published : Apr 20, 2021, 9:24 PM IST

नांदेड जिल्ह्यात 20 एप्रिलपासून अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार आहेत. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

नांदेड
नांदेड

नांदेड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात 14 एप्रिल, 2021ला अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. या आदेशात पूर्वी दिलेला सकाळी 8 ते 1 या वेळेत बदल करण्यात आला असून हा कालावधी आता कमी केला आहे. आता जिल्ह्यात अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार आहेत.

या दुकानांना आहे मुभा -

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता मंगळवारी 20 एप्रिल पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी सर्व खाद्य पदार्थांचे प्रकार (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी इ.) कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादन, पाळीव प्राण्यांच्य अन्न पदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामाशी निगडीत व्यक्तींसाठी तसेच संस्थासाठी देखील साहित्य मिळणारी दुकाने या आस्थापना सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहतील. या दुकानातून घरपोच सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे. या आदेशाची अंमलबजावनी 20 एप्रिल 2021ला रात्री 8 वाजल्यापासून ते दिनांक 1 मे 2021ला सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.