ETV Bharat / state

नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचा राज्यव्यापी आंदोलनात सहभाग; टाळे ठोकण्याचा इशारा

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी लेखणीबंद, अवजार बंद आंदोलन सुरू करण्यात आले.  त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. राज्य सरकारनं तत्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा विद्यापीठांना टाळे ठोकू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

srtmu nanded protest
नांदेडच्या स्वारातीम विद्यापी
author img

By

Published : Sep 27, 2020, 12:18 PM IST

नांदेड- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी लेखणीबंद, अवजार बंद आंदोलन सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावं, पाच दिवसांचा आठवडा करावा, आश्वासित प्रगती योजना सुरू करावी या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारनं तत्काळ या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा विद्यापीठांना टाळे ठोकू, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.

नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठ
या आंदोलनामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर परभणी, लातूर यासह न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी गुरुवारपासून सहभागी झाले आहेत. विद्यापीठ परिसर, उपपरिसर आणि डिग्री कॉलेज येथील सर्व कामकाज शंभर टक्के बंद होते. लवकरच यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा नांदेड दक्षिणचे आमदर मोहन हंबर्डे आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यापीठामध्ये आमदार मोहन हंबर्डे यांनी आंदोलनकर्त्यांस भेट दिली आणि कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांना कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांचे लेखी निवेदन दिले. तसेच आ.बालाजी कल्याणकर यांनीही भेट घेतली. तसेच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिल्ली येथून तर औरंगाबाद येथून आमदार सतीश चव्हाण यांनी आणि नांदेडचे माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी मुंबईवरून फोन करून पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्ता पाटील, इंडियन स्टुडंन्टस मुव्हमेंटचे मराठवाडा अध्यक्ष रुपेश सूर्यवंशी, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवसरकर आदींनी आंदोलनास भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.