ETV Bharat / state

नांदेड जिल्हा परिषद : मंगळवारी होणार अध्यक्षसह उपाध्यक्षपदाची निवडणूक

मंगळवारी (21 जाने.) नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग पहिल्यांदाच होत असून अध्यक्षांच्या नावाचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

Nanded Zilla Parishad
नांदेड जिल्हा परिषद
author img

By

Published : Jan 21, 2020, 9:52 AM IST

नांदेड - जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. दरम्यान, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीबाबत सोमवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित होते. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग होत आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक... जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार महाविकास आघाडीचा प्रयोग

हेही वाचा... अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळामध्ये भ्रष्टाचार झाला.. रोहित पवारांची चौकशीची मागणी

नांदेड जिल्हा परिषदेतील संख्याबळ पाहता, काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, मात्र नेमका व्यक्ती कोण? याबाबत उत्सुकता कायम आहे.

हेही वाचा... 'भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठं करण्याचा सैफ अली खानचा प्रयत्न'

मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ही दोन्ही पदे काँग्रेसकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी अध्यक्षपद अनुसुचित जमाती ( एसटी ) प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाकरता काँग्रेसकडून विजयश्री कमठेवाड (बरबडा), शकुंतला कोमलवाड (येवती), सविता वारकड (बारड), मंगाराणी अंबुलगेकर (बार्हाळी) यांची नावे चर्चेत आहेत. वरील दोन्ही पदांसह विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सोमवारी दुपारी बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे तसेच काँग्रेसचे आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा... साई जन्मभूमी वाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी

असे आहे पक्षीय बलाबल...

जिल्हा परिषदेच्या एकूण ६३ जागांपैकी सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 28 सदस्य, शिवसेनेचे 6, राष्ट्रवादीचे 6, अपक्ष 1, रासप 1 व अन्य 1 असे एकूण ४३ एवढे संख्याबळ असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत जाहीर केले. त्याचबरोबर काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या दावेदार चार महिला सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. लवकरच काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगत चव्हाण यांनी निवड प्रक्रियेपर्यंत 'सस्पेन्स' कायम ठेवला.

Intro:जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग; आज होणार जि. प.अध्यक्षाच्या नावाचा सस्पेन्स कायम...!

नादेड : जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. दरम्यान , अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीबाबत सोमवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित होते. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग होत असून काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष होत असून नेमका कोण याबाबतीतची उत्सुकता कायम आहे. Body:जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग; आज होणार जि. प.अध्यक्षाच्या नावाचा सस्पेन्स कायम...!

नादेड : जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. दरम्यान , अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीबाबत सोमवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित होते. राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग होत असून काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष होत असून नेमका कोण याबाबतीतची उत्सुकता कायम आहे.

मंगळवारी जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ही दोन्ही पदे काँग्रेसकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी अध्यक्षपद अनुसुचित जमाती ( एसटी ) प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. या निवडणुकीसाठी अध्यक्षपदाकरीता काँग्रेसकडून विजयश्री कमठेवाड (बरबडा) , शकुंतला कोमलवाड (येवती) सविता वारकड (बारड), मंगाराणी अंबुलगेकर (बार्हाळी) यांची नावे चर्चेत आहेत. वरील दोन्ही पदांसह विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सोमवारी दुपारी हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या बैठकीत चर्चा झाली. पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला शिवसेनेचे हिंगोलीचे खा. हेमंत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.
प्रदीप नाईक, शंकरअण्णा धोंडगे तसेच काँग्रेसचे आ. अमरनाथ राजूरकर, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी आ. डी. पी. सावंत, वसंतराव चव्हाण, हनमंत पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर, माजी आ. सुभाष साबणे, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

असे आहे पक्षीय बलाबल..
-----------
जिल्हा परिषदेच्या एकूण ६३ जागांपैकी सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे २८ , शिवसेना सहा, राष्ट्रवादी सहा, अपक्ष एक, रासप एक व अन्य एक असे एकूण ४३ एवढे संख्याबळ असल्याचे पालकमंत्री श्री . चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत जाहीर केले. त्याचबरोबर काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या दावेदार चार महिला सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. लवकरच काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगत पालकमंत्री . चव्हाण यांनी निवडप्रक्रियेपर्यंत ' सस्पेन्स ' कायम ठेवला .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.