ETV Bharat / state

नांदेड-नागपूर महामार्गावर टिप्परची जीपला धडक; एक जण जागीच ठार - पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे बातमी

नांदेड ते हिंगोली मार्गे  माल वाहतूक करणाऱ्या जीपला भरधाव वेगातील टिप्परने जीपला जोरदार धडक दिली. यात जीपचालक सुरेश शिवाजी नामकरण (वय ३०) हे यात जागीच ठार झाले.

नांदेड-नागपूर महामार्गावर टिप्परची जीपला धडक एक जण जागीच ठार
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:39 PM IST

नांदेड - येथील नांदेड नागपूर महामार्गावरील खडकूत जवळील बाफना पेट्रोल पंपासमोर अपघात झाला. भरधाव वेगात टिप्परने माल वाहतूक करणाऱ्या जीपला जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना गुरुवारी रात्री घडली.

नांदेड-नागपूर महामार्गावर टिप्परची जीपला धडक एक जण जागीच ठार

हेही वाचा- सरकार अन् उद्योगपतींमध्ये अविश्वास वाढत आहे - उद्योगपती अजय पिरामल

नांदेड ते हिंगोली मार्गे माल वाहतूक करणाऱ्या जीपला (मॅक्स पिकअप क्र- एम.एच.३८ इ.३१७४) भरधाव वेगातील टिप्परने (क्र-एम.एच.२६ ए.डी.२६१०) अचानकपणे टिप्पर पंपात वळवत असताना जबर धडक दिली. जीपमधील चालक सुरेश शिवाजी नामकरण (वय३०) हे यात जागीच ठार झाले. तर टिप्पर चालक जखमी झाला आहे. टिप्परच्या धडकेत माल वाहतूक करणाऱ्या जीपचा अक्षरशः चुराडा झाला आहे. नांदेड-नागपूर महामार्गावर या अपघातामुळे बराच वेळ वाहतुक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस व अर्धापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पिकअप गाडी चुराडा झाल्यामुळे त्यांना क्रेनच्या साहय्याने गाडीला काढावे लागले. बराच वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे व महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पंजाळे, दत्तात्रय डुकरे यांनी सहकार्य केले.

दरम्यान, या मालवाहतूक करणाऱ्या जीपमध्ये बरेच किराणा साहित्य होते. यात काजू-बदामचेही पोते होते. यावर परिसरातील नागरीकानी चांगलाच ताव मारला.

Intro:नांदेड: नागपूर-महामार्गावरील खडकूत जवळील बाफना पेट्रोलपंपा समोर अपघात झाला. भरधाव वेगात टिप्परने माल वाहतूक करणाऱ्या जीपला जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदरील घटना गुरुवारी रात्री घडली.Body:नांदेड-नागपूर महामार्गावर टिप्परची माल वाहतूक करणाऱ्या जीपला धडक एक जण जागीच ठार....!

नांदेड: नागपूर-महामार्गावरील खडकूत जवळील बाफना पेट्रोलपंपा समोर अपघात झाला. भरधाव वेगात टिप्परने माल वाहतूक करणाऱ्या जीपला जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदरील गुरुवारी रात्री घडली.

याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड ते हिंगोली मार्गे जाणाऱ्या माल वाहतूक करणाऱ्या जीपला (मॅक्स पिकअप क्र- एम.एच.३८ इ.३१७४ ) भरधाव वेगातील टिप्परने (क्र-एम.एच.२६ ए.डी.२६१०) अचानकपणे टिप्पर पंपात वळवत असताना जबर धडक दिली. जीपमधील चालक सुरेश शिवाजी नामकरण (वय-३०) हे जागीच ठार झाले. टिप्पर चालक जखमी झाला आहे.
टिप्परच्या धडकेत माल वाहतूक करणाऱ्या जीपचा अक्षरशः चुराडा झाला.
नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात अपघातामुळे बराच वेळ वाहतुक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस व अर्धापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पिकअप गाडी चुराडा झाल्यामुळे त्यांना क्रेनच्या साहय्याने काढावे लागले. बराच वेळ वाहतुक विस्कळीत झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे व महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पंजाळे, दत्तात्रय डुकरे यांनी सहकार्य केले.

दरम्यान या मालवाहतूक करणाऱ्या जीप मध्ये बरेच किराणा साहीत्य होते. यात काजू-बदामचेही पोते होते. यावर परिसरातील नागरीकानी चांगलाच ताव मारला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.