ETV Bharat / state

मुखेड येथील रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट

author img

By

Published : Apr 5, 2020, 12:45 PM IST

या भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून कोरोनाच्या रुग्णासाठी लागेल ते साहित्य खरेदी करावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले.

District Collector visit to mukhed hospital
मुखेड येथील कोरोना रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट

नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी मुखेड व नांदेड रुग्णालय येथे 50 बेडचे विशेष कोरोना रुग्णालय सुरु केले आहे. यात मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यासह देगलुर, नायगाव, कंधार, बिलोली येथील कोरोना रुग्णास आणण्यात येणार आहे. येथील सोयी - सुविधा पाहण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

या भेटीत आ.डॉ. तुषार राठोड यांच्यासह उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार काशिनाथ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,कोरोना विभागाचे नोडल ऑफिसर डॉ नागेश लखमावर ,वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, यांची प्रमुख उपस्थिती होती.

District Collector visit to mukhed hospital
मुखेड येथील रुग्णालयास जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची भेट

या भेटीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून कोरोनाच्या रुग्णासाठी लागेल ते साहित्य खरेदी करावे यासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले. तर, आ.डॉ. तुषार राठोड यांनी रुग्णालयाच्या साहित्य खरेदीसाठी 25 लक्ष रुपये निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला.

जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी शहरातील खाजगी दवाखाने डॉक्टरांनी चालु करावीत अन्यथा त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे यावेळी निर्देश दिले आहेत. खाजगी दवाखाने बंद असल्याने अनेक रुग्णाचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक शहरात येत आहेत. मात्र, शहरातील दवाखाने बंद असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी यांनी खाजगी दवाखाने चालु करण्यात यावे, असे निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. वीपीन इटनकर यांच्या हस्ते गोर गरीब, हातावरचे पोट असणाऱ्यास धान्यही वाटप करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.