नांदेड- जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांची सेवा महत्वाची ठरते. रुग्णाची काळजी घेताना त्यांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. पीपीई किटची सर्वत्र कमतरता भासत आहे. अशा स्थितीत निमी या संघटनेने पुढाकार घेत अर्धापूर तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राला पीपीई किटचे वाटप केले आहे.
हेही वाचा- कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर
कोरोना संसर्गाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन शासनाच्या आरोग्य विभागाकडून डाॅक्टर्सच्या सुरक्षिततेसाठी पीपीई किट, एन ९५ मास्क व अन्य आवश्यक ते साहित्य पुरविणे गरजेचे आहे. मात्र, सध्या त्याचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेवून निमा संघटनेकडून वैद्यकीय व्यवसायिक डॉ. विनोद जाधव यांनी वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित डाॅक्टरांना पीपीई किटचे वाटप केले.
यावेळी तहसीलदार सुजीत नरहरे, निमा वैद्यकीय अधिकारी सेलचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. उत्तम इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.झिने, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी डॉ. विशाल लंगडे, डॉ. दिपक काळे, सागर तिडके आदी मान्यवर उपस्थित होते.