ETV Bharat / state

अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत - देवेंद्र फडणवीस

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नांदेडजवळील असर्जन कौठा ( मामा चौक ) येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ते संबोधित करत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(संग्रहित)
author img

By

Published : Apr 7, 2019, 1:50 AM IST

Updated : Apr 7, 2019, 1:59 AM IST

नांदेड - अशोकराव यांना मोठी पदे मिळुनही विकास करू शकले नाहीत. चव्हाणांकडे रॉकेल, पेट्रोलपासून ते मोटारसायकलपर्यंत डीलरशिप असून ते 'लीडर' नाहीतर 'डीलर' आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नांदेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह युतीचे मोठे नेते उपस्थित होते.

मराठवाड्यात रेल्वेची १३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात रस्त्याची ८ हजार ५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. लेंडीसारखे प्रकल्पाचे काम सुरू असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२०० कोटी रुपयांचा विमा मिळाला असून केंद्र सरकारने संकटकाळी मराठवाड्याला मदत केल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करताना त्यांना डिलर म्हणून उल्लेख केला. यावेळी लीडर म्हणून निवडून आणण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने सक्षम उमेदवार दिल्याचे ते म्हणाले. २०१४ मध्ये नांदेडचा विजय थोडक्यातून गेला. मात्र, यावेळी नांदेडमध्येही मोदी सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

  • Despite getting opportunity to serve as Minister & CM, @AshokChavanINC has done nothing for Nanded.

    Congress party has NO LEADERS but only DEALERS !

    And on seeing the manifesto of Congress, I ask Rahul Gandhi, if this manifesto is of your party or of Jaish-e-Mohammed? pic.twitter.com/yLu8EXlnIr

    — Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावेळी युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बोलताना चव्हाणांना लक्ष्य केले. नांदेडमध्ये चव्हाण आणि काँग्रेसची सत्ता असतानाही एकही उद्योग आणला नाही. सध्या आहेत ते उद्योग बंद पाडले. नांदेडमध्ये मोदी टायर्ससने ४०० एकर संपादीत केली आहे. मात्र, अजूनही उद्योग सुरू नाही. मात्र, भाजप सरकारने लगेच नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. नांदेड लोहा-लातूर मार्गालाही आपण मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याशिवाय दमणगंगा-पिंजा या नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीला जोडावे, लेंडी प्रकल्प पूर्ण करावा, गुरुद्वारा बोर्डाच्या संदर्भातील कलम ११ रद्द करावे अशा विविध मागण्यांही त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या. नांदेडची लढाई ही माझी एकट्याची नसून सर्व नांदेडवासीयांची आहे. यावेळी नक्कीच नांदेडला भाजपचा खासदार होईल, असा विश्वास चिखलीकरांनी व्यक्त केला.

या सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते.

Intro:अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत-देवेंद्र फडणवीस

Body:
अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत-देवेंद्र फडणवीस
------------------------------------

नांदेड: नांदेड जिल्ह्यात अशोकराव यांना मोठी पदे मिळूनही विकास करू शकले नाहीत. अशोकराव 'लीडर' नाहीतर 'डीलर' आहेत. रॉकेल, पेट्रोलपासून ते मोटारसायकल पर्यंत डीलरशिप त्यांची आहे. अशी टिका असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे केली.
नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील सभेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, मराठवाड्यात रेल्वेची १३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात रस्त्याची आठ हजार ५०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. लेंडीसारखे प्रकल्पाचे काम सुरू असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२०० कोटी रुपयांचा विमा मिळाला आहे. केंद्र सरकारने संकटकाळी मराठवाड्याला मदत केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने एक सक्षम पंतप्रधान मिळाला आहे. यावेळी लीडर म्हणून निवडून आणण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा की जैश-ए-मोहमद चा जाहिरनामा आहे हे आम्हाला स्पष्ट करून काँग्रेसने सांगावे. असे आवाहन केले. मागचा नांदेडचा विजय थोडक्यातुन गेला. यावेळी नांदेडमध्येही मोदी सरकार येईल असा विश्वास केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर प्रतापराव पाटील चिखलीकर बोलताना म्हणाले की, नांदेडमध्ये चव्हाण व काँग्रेसची सत्ता असतानाही एकही उद्योग आणला नाही. आहेत ते उद्योग बंद पाडले. नांदेडमध्ये मोदी टायर्ससारखी ४०० एकर संपादीत केली आहे. पण अजूनही उद्योग सुरू नाही. लातूरप्रमाणे नवीन मोठे उद्योग मंजूर करावेत. नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. याबद्दल आभार मानले. नांदेड लोहा-लातूर मार्गालाही आपण मंजुरी देऊन काम सुरू करावे, दमणगंगा-पिंजा या नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीला जोडावे, लेंडी प्रकल्प पूर्ण करावा, गुरुद्वारा बोर्डाच्या संदर्भातील कलम ११ रद्द करावे अशा विविध मागण्या केल्या. नांदेडची लढाई ही माझी एकट्याची नसून सर्व नांदेड वासीयांची आहे. यावेळी नक्कीच नांदेडला भाजपचा खासदार होईल असा विश्वास व्यक्त केला.

Conclusion:
Last Updated : Apr 7, 2019, 1:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.