नांदेड - भाजपच्या 5 नगरसेवकांनी घेतलेल्या बैठकीत आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. तसेच महापौरांनी यापूर्वी केलेली या पदावरील निवड उच्च न्यायालयाने रद्द ठरवून सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असल्याने आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा - लातूर महानगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर
यापूर्वीच्या महापौर शीला भवरे यांनी भाजप महानगराध्यक्षांच्या पत्रावरुन विरोधी पक्षनेतेपदी गुरुप्रितकौर सोडी यांची केलेली निवड उच्च न्यायालयाने 1 मार्च रोजी रद्द केली होती. तसेच भाजपच्या 6 नगरसेवकांमधून विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्याचे आदेश महापौरांना दिले होते. या आदेशाला दोन आठवड्याची स्थगिती देखील न्यायालयाने दिल्यानंतर सोडी व महापौर यांनी सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यांनी उच्च न्यायालयाची मुदत संपण्याच्या दिवशीच आदेशाल स्थगिती मिळविली. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या दोन्ही याचिका फेटाळून लावल्यामुळे उच्च न्यायालयाचे आदेश कायम झाले आहेत. या आदेशाप्रमाणे आपली विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, अशी मागणी दीपकसिंह रावत यांनी महापौरांकडे केली आहे.
हेही वाचा - काँग्रेस विधीमंडळ नेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात?, दोन्ही माजी मुख्यमंत्री शर्यतीत