नांदेड - शेतात बैल चरण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नांदेडमधील सारखणी येथे घडली आहे.
हेही वाचा - शिवसेनेला सहाव्या अपक्ष आमदाराचा पाठिंबा; शिवसेना समर्थक आमदारांची संख्या ६२
दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सारखणी येथील रोहित रामदास गेडाम (वय १९) हा तरुण माहूर रस्त्यावरील मोबाईल टॉवरजवळ असलेल्या शेतात बैल चारत होता. या दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात रोहितच्या अंगावर वीज पडली. रोहित जागीच कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारील लोकांनी त्याला दहेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी नेले.
परंतु, रोहित मृत पावला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती सिंदखेड पोलिसांना मिळाल्यानंतर दारासिंग चौहान व हेमंत मडावी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.