ETV Bharat / state

पप्पांसाठी मुली उतरल्या रस्त्यावर; अशोक चव्हाणांच्या प्रचारासाठी कुटुंब एकवटलं - election campaign

अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाण या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.

सुजया चव्हाण
author img

By

Published : Apr 2, 2019, 9:30 PM IST

नांदेड - शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी आता राजकारणात उतरली आहे. अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाण या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. सुजया नांदेडमध्ये महिला कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित करत असून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुजया चव्हाण

वडिल निवडून यावेत यासाठी प्रचार करत आहे. आम्हाला प्रचार करताना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सुजया यांनी सांगितले. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सुजया प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी अमिता या निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत.

प्रचारादरम्यान अनेक नागरिक आजोबा आणि वडिलांच्या आठवणी सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. आधी केलेल्या कामांमुळे लोकांचा काँग्रेस पक्षाला प्रतिसाद असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच समाजकार्यात रस असल्याने आपण प्रचार करत असल्याचे सुजया यांनी सांगितले.

यावेळेला नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर पहायला मिळत आहे, त्यातून पहिल्यांदाच चव्हाण यांच्या कन्या प्रचारात उतरल्या आहेत.

Intro:नांदेड - चव्हाण यांची तिसरी पिढी राजकीय मैदानात...
नांदेड : शंकरराव चव्हाण यांची तिसरी पिढी आता राजकारणात आली आहे. अशोक चव्हाण यांची कन्या सुजया चव्हाण ही पहिल्यांदा निवडणूक प्रचारात उतरली आहे.Body:आपले पप्पा निवडून यावेत यासाठी सुजया लोकसभा मतदार संघात जाऊन प्रचार करते आहे. काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन सुजया प्रचार करत असून. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी अमिता ह्या ही निवडणूक प्रचारात आहेत. प्रचारादरम्यान अनेक जुन्या आठवणी समोर येत असून आजोबा शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईने नांदेडकर विसरणार नाहीत आणि पपांना भरघोस मतांनी निवडून देणारचं समाजकार्यात रस असल्याने आपण प्रचार करत असल्याचे सुजया ने सांगितल आहे.Conclusion:
यावेळेला नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी काटे की टक्कर पहायला मिळतेय, त्यातून पहिल्यांदाच चव्हाण यांच्या कन्या प्रचारात उतरलेल्या दिसत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.