ETV Bharat / state

अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार हेक्टर शेतीचे नुकसान- अशोक चव्हाण - माजी आमदार किशन राठोड

यावर्षी जिल्ह्यातील ८१ महसूल मंडळ अतिवृष्टीत बाधित झाले आहेत. तर नुकत्याच चार दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका ५३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतीचे नुकसान
शेतीचे नुकसान
author img

By

Published : Sep 9, 2021, 10:14 PM IST

नांदेड- अतिवृष्टीमुळे नांदेडसह राज्यभरात मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने १०० टक्के मदत करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेतला. कंधार, मुखेड, बिलोली आणि देगलूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी चव्हाण यांनी केली.

मोती नदीला आलेल्या पुरात माजी आमदार किशन राठोड यांचा मुलगा आणि नातू यांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी राठोड कुटुंबियांच्या कामळेवाडी येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले.

अतिवृष्टीने नांदेड जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

हेही वाचा-पुण्यापाठोपाठ मुंबईतही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी

अशोक चव्हाण यांनी माजी आमदार किशन राठोड यांचे केले सांत्वन

नांदेड जिल्ह्यात सरासरी १०७ टक्के जास्त पाऊस-

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरी ८९१ मी. मी. पाऊस पडतो. मात्र, यावर्षी पावसाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. चालू वर्षात ९६२.४५ मी. मी पाऊस झाला आहे. हा आकडा सरासरी पावसापेक्षा १०७ टक्के जास्त आहे. यामुळे शेती, पिके आणि जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर्षी जिल्ह्यातील ८१ महसूल मंडळ अतिवृष्टीत बाधित झाले आहेत. तर नुकत्याच चार दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका ५३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा-आमदार नितेश राणे अन् त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांच्याविरोधात 'लूकआउट नोटीस' जारी

जनावरे आणि मानवी जीवित हानी-

अतिवृष्टीमध्ये शेती पिकांसोबतच जनावरे आणि मानवी जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीत एकूण २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण लहान आणि मोठे असे ८७ जनावरे दगावली आहेत.

हेही वाचा-बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न - महापौर किशोरी पेडणेकर

जवळपास पन्नास टक्केच्यावर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित-

खरीप हंगामा जिल्ह्यात एकूण ७ लाख ५० हजार क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती. यात सोयाबीन, कापूस व तूर या पिकांचा समावेश होता. यापैकी 3 लाख 65 हजार 561 हेक्टर शेतीचे नुकसान, यासंबंधी पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. सध्या अनेक भागात पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. यामुळे मदतकार्याला वेळ लागत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यातील सात तलाव फुटले-

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारे फटका बसला आहे. शेतीच्या पिकांसोबत जीवितहानी देखील मोठ्याप्रमाणावर झाली आहे. त्यासोबतच साठवण तलावदेखील फुटले आहेत. जिल्ह्यात एकूण सात साठवण तलाव अतिवृष्टीमुळे फुटले आहेत. लोहगाव येथे फुटलेल्या तलावाची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. या तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत.

तात्काळ मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू-

सध्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यभरात मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांसह मालमत्तेचेदेखील बाधित झाले आहेत. यामुळे मदतीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत १०० टक्के मदतीची मागणी करू, असे आश्वासन अशोक चव्हाण यांनी दिले आहे. यासाठी मी स्वतः मंत्रिमंडळ बैठकीत ही मागणी करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.