नांदेड:- जिल्ह्याच्या विविध विकास कामामध्ये ग्रामीण भागात शेतीला पुरक उद्योगाची जोड देण्यात व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये दुग्धव्यवसाय हा अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडू शकेल. या व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते नांदेडमध्ये बोलत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या आजारी पडलेल्या पशुधनाला त्यांच्या गावातच उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या तीन पशु चिकित्सा व उपचार वाहनाचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या प्रागंणात चव्हाण यांच्य हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी 355 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याचेही चव्हाण म्हणाले. शिवाय जिल्हा परिषदेच्या योजनेचे त्यांनी कौतूक केले. शासकीय योजनांचा प्रसार तालुका पातळीवर व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
'शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीपुरक उद्योगात पशु व दुग्ध व्यवसायाला चालना महत्वाची' - अशोक चव्हाण बातमी
मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला पुरेशा साधन सामुग्रीसह एक पशु चिकित्सा वाहन उपलब्ध करुन देण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील असे, प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.