ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात सायंकाळी नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी; केश कर्तनालये पुन्हा बंद - नांदेड कोरोना अपडेट

नांदेडात अत्यावश्यक साधने, सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द सर्व संबंधित यंत्रणांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. देण्यात आले आहेत.

nanded
नांदेड जिल्ह्यात सायंकाळी नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी
author img

By

Published : Jun 1, 2020, 9:20 PM IST

नांदेड - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सोमवार 1 जूनपासून पुढील आदेशापर्यंत फौजदारी कलम 144 (1) (3) अन्वये लागू करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात सायंकाळी नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. याचबरोबर आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिने केश कर्तनालय दुकाने, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी दिलेली मुभा रद्द करण्यात आली आहे.

अंत्यविधीमध्ये 50 नागरीकांना सहभागाची दिलेली मुभा कमी करुन त्याऐवजी 20 नागरीकांपेक्षा जास्त नागरीकांना सहभागी होता येणार नाही. संचारबंदीच्या काळात कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्त रुग्ण व त्यांच्यायसोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्यास अशा व्य्क्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा नॉन रेड झोनमध्ये असल्याने यापूर्वी या कार्यालयाकडून दुकाने व आस्थापना व इतर परवानगी दिलेल्या‍ बाबी प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन्स) वगळून उर्वरित क्षेत्राकरिता नियम व अटीच्या अधीन सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत यापुढेही चालू राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. अत्यावश्यक साधने, सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुध्द सर्व संबंधित यंत्रणांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत असताना सदहेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.