नांदेड - एनसीबीच्या (NCB) पथकाने सलग तीन दिवस पाठलाग करत गांजा (Cannabis) घेऊन जात असलेला एक ट्रक कारवाई केली आहे. विशाखापट्टणम येथून जळगावकडे गांजाने भरलेला ट्रक जात आहे, अशी गोपनीय माहिती एनसीबी (ncb) विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने ही कारवाई केली आहे. संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेऊन एनसीबीच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील मांजरम या गावात ट्रक अडवून छापा टाकला. या कारवाईत गांजाने भरलेले 49 पोते ताब्यात घेण्यात आले.
विशाखापट्टणम येथून जळगावकडे जात होता ट्रक
आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून गांजाने भरलेला ट्रक जळगावकडे जात होता. नायगाव तालुक्यातील मांजरम गावात एनसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या ट्रकमध्ये चोवीस ते तीस किलो वजनाचे एकूण 49 पोते भरण्यात आले होते. एनसीबीने कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला आहे.
एनसीबीच्या पथकाने तीन दिवस केला पाठलाग..!
मुबईच्या एनसीबी पथकाने केलेल्या कारवाईत गांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. गांजाने भरलेले जवळपास 49 पोते या कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. तर चालक आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आले. एनसीबीला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार ही कारवाई करण्यात आली. यासाठी एनसीबीच्या एका पथकाने सलग तीन दिवस या ट्रकचा पाठलाग केला. आंध्रप्रदेश राज्यातून हा ट्रक महाराष्ट्रात दाखल होऊ दिला. सोमावारी (दि. 15 नोव्हेंबर) सकाळी चार वाजता मांजरम येथे हा ट्रक अडवण्यात आला. एनसीबीचे पथक प्रमुख अमोल मोरे आणि त्यांचे सहकारी सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे यांनी ही करावाई केली. या कारवाईसाठी गावकऱ्यांची देखील मदत घेण्यात आली.
हे ही वाचा - Raju Shetti : विमा कंपनीत मोठे स्कॅंडल; राज्यासह केंद्रातील उच्च पदस्थ सहभागी - राजू शेट्टी