नांदेड - जिल्ह्याला किंचितचा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या काळात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. प्राप्त झालेल्या 3 हजार 981 अहवालापैकी 1 हजार 99 अहवाल कोरोना बाधितांचे आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 788 तर अँटिजेन तपासणीद्वारे 311 अहवाल आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 72 हजार 890 एवढी झाली असून यातील 57 हजार 273 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 14 हजार 8 रुग्ण उपचार घेत असून 240 बाधितांची प्रकृती गंभीर आहे.
औषधोपचारानंतर सुट्टी दिलेले बाधित
जिल्ह्यात 1 हजार 293 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रु्ग्णालयात घर सोडण्यात आले आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 18, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 719, भोकर तालुक्यातंर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 13, अर्धापूर तालुक्यातंर्गत 20, उमरी तालुक्यातंर्गत 24, खाजगी रुग्णालय 107, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 48, मुखेड कोविड रुग्णालय 130, कंधार तालुक्यातंर्गत 24, किनवट कोविड रुग्णालय 64, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 29, बारड कोविड रुग्णालय 4, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 29, हदगाव कोविड रुग्णालय 11, माहूर तालुक्यातंर्गत 17, नायगाव तालुक्यातंर्गत 2, लोहा तालुक्यातंर्गत32, मांडवी कोविड केअर सेंटर 1 यांचा समावेश आहे.
बाधितांवर औषधोपचार
जिल्ह्यात 14 हजार 8 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 245, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 111, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 209, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 137, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 142, नायगाव कोविड केअर सेंटर 52,उमरी कोविड केअर सेंटर 70, माहूर कोविड केअर सेंटर 57, भोकर कोविड केअर सेंटर 13, हदगाव रुग्णालय 51, बारड कोविड केअर सेंटर 15, भक्ती कोविड केअर सेंटर 56, एनआरआय कोविड केअर सेंटर 85, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 210, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 5 हजार 923 , मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 179, देगलूर कोविड रुग्णालय 54, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 61, बिलोली कोविड केअर सेंटर 94, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 105, कंधार कोविड केअर सेंटर 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 133, मुदखेड कोविड केअर सेंटर 312, अर्धापूर कोविड केअर सेंटर 9, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 451 खाजगी रुग्णालय 2 हजार 184 , हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 14 हजार 8 रुग्ण उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 8 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण स्वॅब - 4 लाख 31 हजार 7
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 49 हजार 644
एकूण कोरोनाबाधित व्यक्ती - 72 हजार 890
एकूण रुग्णालयातून घरी सोडलेले रुग्ण - 57 हजार 273
एकूण मृत्यू संख्या -1 हजार 349
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.57 टक्के
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 45
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 88
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 379
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 14 हजार
अतिगंभीर प्रकृती असलेले रुग्ण -240