ETV Bharat / state

नांदेडमध्ये सोमवारपासून दोन सत्रात सुरू होणार न्यायालयीन कामकाज - nanded district court

कोविड १९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाबाबत व न्यायालय प्रवेशाबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेडच्या न्यायालयीन कामकाजाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोलकिया यांनी सूचना जारी केल्या आहेत.

nanded court
नांदेडमध्ये सोमवारपासून दोन सत्रात सुरू होणार न्यायालयीन कामकाज
author img

By

Published : Jun 6, 2020, 10:53 AM IST

नांदेड - जिल्हा न्यायालयाचे कामकाज ८ जूनपासून दोन सत्रांमध्ये सुरू होणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत कामकाज होईल तर दुपारच्या सत्रात अडीच ते साडे पाच या वेळेत कामकाज सुरू राहणार आहे. कोविड १९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाबाबत व न्यायालय प्रवेशाबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार नांदेडच्या न्यायालयीन कामकाजाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोलकिया यांनी सूचना जारी केल्या आहेत.

नांदेडमध्ये सोमवारपासून दोन सत्रात सुरू होणार न्यायालयीन कामकाज

नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नांदेड यांच्याकडे दाखल होणारी सर्व प्रकरणे (दोषारोपपत्र वगळून) कामकाजाच्या दिवशी फक्त सकाळी साडे दहा ते दीड या वेळेत निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये दाखल करून घेण्यात येतील. तसेच एक वकील एकावेळी दहापेक्षा जास्त प्रकरणे दाखल करू शकणार नाही. जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणातील शपथपत्रांची पडताळणी कामकाजाच्या दिवशी सकाळी साडे दहा ते दुपारी १.३० यावेळात केली जाईल. संबंधित वकिलांनी आपापली प्रकरणे निर्दिष्ट जागी उपलब्ध करून दिलेल्या बॉक्समध्ये टाकावीत. कोणत्याही वकिलास कामकाजावेळी न्यायालयातील संचिका प्रत्यक्ष हाताळता येणार नाही. सर्व वकिलांनी शक्यतो आपापल्या प्रकरणातील युक्तीवाद लेखी स्वरुपात सादर करावा.

न्यायालय प्रवेश व संचार याबाबत निर्देश -

न्यायालयातील दैनिक बोर्डवर असणाऱ्या व पक्षकाराच्या अनुपस्थितीत घेता येणाऱ्या फक्त युक्तीवाद व अंतरिम युक्तीवाद असलेल्या प्रकरणात वकिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या समोरच्या कार्यालयामधून न्यायालयातील प्रवेशाबाबत प्रवेश पत्र/पास अदा केले जाणार आहेत. ज्या वकिलांकडे प्रवेशपत्र आहे, त्यांनाच न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाईल. ज्येष्ठ वकिलांसोबत त्यांच्या सहकारी कनिष्ठ वकिलास न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही पक्षकारास न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही. न्यायालय परिसरात प्रवेश करताना सर्वाची थर्मल तापमापक संयंत्राद्वारे तपासणी केली जाईल. ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असलेल्या किंवा सर्दी, पडसे इत्यादी कोविड-१९ ची अन्य लक्षणे असलेल्या किंवा घोषित केलेल्या प्रतिबंधक क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीस न्यायालयात किंवा न्यायालयाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

अभिवक्ता संघाची सर्व दालने बंद ठेवण्यात येतील याची नोंद घ्यावी, असेही निर्देश दिले आहेत. तसेच सर्व विधीज्ञ आणि पक्षकारांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोविड-१९ पासून बचाव करण्याच्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून न्यायालयातील कामकाज सुरुळीतपणे पार पाडण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोलकिया यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.