ETV Bharat / state

नांदेडमधील विष्णुपुरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची प्रयोगशाळा सुरु

नांदेडमधील विष्णुपुरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची प्रयोगशाळा सुरु आली आहे. यामुळे स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील प्रयोग शाळेवरील काम कमी होणार आहे. जिल्ह्यात दोन प्रयोगशाळा मध्ये नमुन्यांची तपासणी होणार असल्याने त्याचे अहवाल लवकर मिळणार आहेत.

nanded corona update
नांदेड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 13, 2020, 3:52 PM IST

नांदेड- जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या स्वॅबचे अहवाल मिळण्यास पूर्वीसारखा वेळ लागणार नाही. कारण डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा कोविड-१९ प्रयोग शाळा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेवर येणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून नमून्यांचा अहवाल वेळेत प्राप्त होऊ शकणार आहे.

सुरुवातीच्या काळात नांदेड येथील कोरोना तपासणीचे अहवाल हे औरंगाबाद व पुणे येथे जात होते. परंतु केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या बायोलॉजी विभागात ही प्रयोग शाळा सुरु करण्यात आली. या प्रयोग शाळेकडे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील स्वॅब तपासणीला येत होते. तसेच नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी येत असल्याने अहवाल येण्यास विलंब होत होता. यावरून बऱ्याच वेळा ओरड होत असे.यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेतला. यामुळे नियोजन समितीच्या निधीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे.

राज्य शासनाने ९ जून रोजी परवानगी दिल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही प्रयोग शाळा सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी २७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले असल्याचे सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रा.संजयकुमार मोरे यांनी सांगितले. या प्रयोग शाळेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णांचे अहवाल तपासले जाणार आहेत. मनपा हद्दीतून येणारे स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेकडे जाणार असल्याचे या विभागाच्या प्रमुख डॉ.सुप्रिया येमेकर व डॉ. संजयकुमार मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २३४ वर पोहोचली आहे. १६० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.६१ जणांवर नांदेड शहर तसेच अन्य ठिकाणच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.