नांदेड - शहरात कोरोनाने हात-पाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज सकाळी मनपा कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी उपस्थित होते.
नांदेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सव्वा दोनशेवर पोहचली आहे. शहरातील नवीन भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नवीन भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याबाबत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मनपा कार्यालयात घेतली. या बैठकीत कोरोनाबाबतच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करून सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीला महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.