ETV Bharat / state

नांदेडकरांनो सावधान! जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Nanded Government Hospital
नांदेड शासकीय रुग्णालय
author img

By

Published : Mar 5, 2021, 10:24 AM IST

नांदेड - जिल्ह्यात गुरुवारी (4 मार्च) सायंकाळी पाच वाजेपर्यंत 125 नवीन कोरोना रुग्ण आढळले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 60जण तर अँटिजेन तपासणीद्वारे 65 जण बाधित आले आहेत. उपचार घेत असलेल्या 81 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 24 हजारपार -

गुरुवारी मिळालेल्या 1 हजार 799 अहवालांपैकी 1 हजार 658 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 31 एवढी झाली असून यातील 22 हजार 516 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सध्या 698 कोरोना बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

एका पुरुषाचा मृत्यू -

बुधवारी (3 मार्च) किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविडमुळे जिल्ह्यातील 603 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के -

गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 58, मुखेड कोविड रुग्णालय 2, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, खासगी रुग्णालय 12 अशा एकूण 81 जणांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के आहे.

जिल्ह्यात 698 बाधितांवर औषधोपचार सुरू -

नांदेड जिल्ह्यात सध्या 698 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 39, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 62, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 29, किनवट कोविड रुग्णालयात 19, मुखेड कोविड रुग्णालय 5, हदगाव कोविड रुग्णालय 6, महसूल कोविड केअर सेंटर 52, देगलूर कोविड रुग्णालय 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 274, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 109, खाजगी रुग्णालय 97 जण आहेत. सद्यस्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 146, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 बेड उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील कोरोना संशयित व कोरोना बाधितांची संक्षिप्त माहिती -

एकूण घेतलेले स्वॅब - 2 लाख 35 हजार 470

एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 7 हजार 123

एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 24 हजार 31

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 22 हजार 516

एकूण मृत्यू संख्या - 603

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के

गुरुवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 6

गुरुवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 6

गुरुवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 201

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 698

गुरुवारी रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले -18

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.