ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: नांदेडमधील एका टरबूज उत्पादक शेतकऱ्याला तब्बल दहा लाखांचा फटका बसण्याची शक्यता

'कोरोना'मुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे दळण-वळण व बाजारपेठा ठप्प आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एका टरबूज, फुल आणि कोबी उत्पादक शेतकऱ्याला एकूण नुकसान दहा लाख रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

nanded corona update
लक्ष्मणराव उर्फ माधवराव कवडे
author img

By

Published : Mar 26, 2020, 9:28 PM IST

नांदेड - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. जीवनावश्यक वस्तुंना यातून वगळले असले तरी शेतकऱ्यांना दररोज उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळ, फुल आणि भाजीपाला या पिकांना ग्राहकच नसल्याने लाखो रुपयांचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील पार्डी म. (ता.अर्धापूर) येथील लक्ष्मणराव उर्फ माधवराव कवडे या शेतकऱ्यांकडे सात एकर शेतमाल संचारबंदीमुळे पडून आहे. वाहतुकीची व्यवस्था करून देण्याची मागणी शेतकऱ्याने सरकारकडे केली आहे.

शेतीमध्ये अडीच एकर टरबूज, दोन एकर कोबी, दहा गुंठे टोमॅटो, तीस गुंठे शेड-नेटमधील गुलाब व इतर बिजली, शेवंतीसारखी वेगवेगळ्या जातीची फुले आहेत. ही काढणीस आलेली नकद पिके आहेत. 'कोरोना'मुळे लागू असलेल्या संचारबंदीमुळे दळण-वळण व बाजारपेठा ठप्प आहेत. यातून जरी फळे व भाजीपाला या पिकांना वगळले असले तरी घेणारा ग्राहक तुलनेने प्रचंड तुरळक आहे. त्यामुळे व्यापारी माल उचलण्यास तयार नाहीत. सदरील पिकांच्या लागवडीसाठी या शेतकऱ्याने चार लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. शेतकऱ्याला जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. तर फुलांच्या माध्यमातून दररोज तीन ते पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे.

कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवल्याने दळणवळणाची साधने बंद करण्यात आली आहेत. देशात संचारबंदी लागू असल्याने खरेदी करण्यासाठी व्यापारी बाहेर पडत नाहीत. अशा अनेक शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसत आहे. सदरील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

लक्ष्मणराव कवडे यांच्या शेतात असलेला माल आणि नुकसानीची शक्यता -

दोन एकर पत्ता गोबी

५० टन माल पडून आहे.
५ हजार रुपये प्रति टन प्रमाणे अडीच लाख रुपये मिळण्याची क्षमता
एकूण खर्च ४५ हजार रुपये.
एकूण नुकसान - तीन लाख रुपये

टरबूज

२.५ एकरसाठी बियाणे, खते,औषधी, मलचिंग, मजुरी मिळून खर्च - १,७५,००० रुपये
अपेक्षित उत्पादन एकरी - ३० टन प्रमाणे ७५ टन. प्रतिटन सात हजार रुपये प्रमाणे -५,२५,०००
खर्च - १,७५,०००
एकूण नुकसान - ७,००,०००

एकूण नुकसान दहा लाख रुपयांचा फटका शेतकऱ्याला बसत असल्याचे या विवरणावरून लक्षात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.