ETV Bharat / state

स्वरातीम विद्यापीठाने देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करावे - राज्यपाल - Swami ramanand tirth marathwada university

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून संबोधन करताना राज्यपाल बोलत होते.  दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन, स्वरातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन व विद्यापीठाच्या विविध प्राधिकृत मंडळांचे सदस्य व स्नातक उपस्थित होते.

राज्यपाल कोशारी
राज्यपाल कोशारी
author img

By

Published : May 4, 2021, 8:58 PM IST

मुंबई - गुरु गोविंदसिंह यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले नांदेड एक प्रेरणादायी तीर्थक्षेत्र आहे. नांदेडला देशात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे तेथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा (स्वरातीम) विद्यापीठाने देखील प्रयत्नपूर्वक देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करावे व ऑक्सफर्डप्रमाणे नांदेडला गुणवत्तेचे सर्वोत्तम केंद्र करावे, अशी सूचनावजा अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून संबोधन करताना राज्यपाल बोलत होते. दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन, स्वरातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले, प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन व विद्यापीठाच्या विविध प्राधिकृत मंडळांचे सदस्य व स्नातक उपस्थित होते.

दीक्षांत समारोहास उपस्थित सर्व स्नातक, पीएच. डी. प्राप्त उमेदवार तसेच सुवर्ण पदक विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, सध्याचे युग आंतरशाखीय अध्ययनाचे आहे. अशावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी टीम स्पिरिटने तसेच परस्पर सहकार्याने काम केल्यास सफलता निश्चितपणे प्राप्त होईल. स्नातकांनी पदवी प्राप्तकरून अल्पसंतुष्ट न राहता आपले शिक्षण सातत्याने सुरू ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षमता असून ते समाजाला, देशाला तसेच मानवतेला मोठे योगदान देऊ शकतात याचे कोश्यारी यांनी स्मरण दिले. समाज आपल्याला नेहमीच देत असतो, आपण समाजाला अधिकाधिक कसे देऊ शकतो याचा विद्यार्थ्यांनी विचार केल्यास विद्यापीठ देशात आदर्श निर्माण करू शकेल, असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.