ETV Bharat / state

नांदेड : नक्षलग्रस्त सिमावर्ती भागात पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन - Combing operation border area nanded news

नांदेड जिल्यातील नक्षलग्रस्त किनवट अरण्यात वनविभाग आणि पोलिसांच्या वतीने कोम्बिंंग ऑपरेशन करण्यात आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड : नक्षलग्रस्त सिमावर्ती भागात पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन.

author img

By

Published : Sep 30, 2020, 11:13 AM IST

नांदेड : जिल्यातील नक्षलग्रस्त म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या किनवट अरण्यात बोधडी वनविभाग व पोलीस विभागाच्यावतीने कोम्बिंंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी डोंगरगाव मांजरी कैलास टेकडी आणि वाघदरी परिसरातील घनदाट अरण्यामध्ये पंधरा किलोमीटर नक्षलग्रस्त भागाची पाहाणी करण्यात आली.

किनवट येथील उपविभागीय पोलिस अधीक्षक मंदार नाईक यांनी इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशन कांदे नक्षलवादी पथकातील सी ४७ चे सशस्त्रधारी दहा जवान व बोधडी वनविभागाचे आठ वनरक्षक असा फौजफाटा घेत जलधरा अरण्य तसेच डोंगरगाव वाघदरी ते कैलास टेकडी असा पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास केला. या कोम्बिंंग आँपरेशनमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घनदाट जंगलात नक्षलवादी दडून बसला असेल अशा प्रकारच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.